पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण हें वर्णन करतां येणें शक्य नाहीं ! जिकडे तिकडे बर्फाचे पर्वतप्राय डोंगर नेपोलियनच्या सैन्याचे हाल. असून त्यांमधून जातांना कित्येक फ्रेंच सैनिक मृत्युमुखी पडत ! वाटेंत या अवाढव्य फ्रेंच सैन्यास अन्नसामुग्री मिळण्याची पंचाईत पडत असल्यानें आपली भूक शमविण्यासाठीं घोड्याच्या मांसावर देखील रहा- ण्याची त्यांच्यावर पाळी आली ! अशारीतीनें मोठ्या कष्टानें हें अवाढव्य सैन्य दरकूच दरमजल करीत चाललें असतां अडीअडचणीच्या ठिकाणीं ' कोझॅक ' लोकांच्या लहान लहान टोळ्या त्यावर हल्ला करून त्यास त्रास देत ! अशा प्रकारें फ्रेंच सैन्य मोठ्या कष्टानें परत येत असतां खुद्द फ्रान्समध्यें बराच गोंधळ माजला आहे अशी बातमी समजतांच नेपोलियन ५ डिसेंबर रोजी आपलें सैन्य मागें ठेऊन आपल्या थोड्या अनुयायांसह फ्रान्समध्ये दाखल झाला. यानंतर कांहीं दिवसांनी मोठ्या जय्यत तयारी- निशीं गेलेल्या पांच लाख सैन्याचा थोडासा अवशेष परत फ्रान्सला येऊन ठेपला ! रशियावरील मोहिमेंत नेपोलियनच्या अवाढव्य सैन्याचा विनाश झालेला पाहून इतर युरोपियन राष्ट्रांतील मुत्सद्दी व देशाभिमानी लोक आपल्या राष्ट्रांतील लोकांस नेपोलियन विरुद्ध उद्युक्त करूं लागले. आपलें स्वातंत्र्य परत मिळविण्याची हीच संधि आहे, व ही संधि गमविल्यास आपल्या मानेवरील परकी- यांच्या दास्यत्वाचें जूं कायमचेंच बसणार, तेव्हां नेपोलियनविरुद्ध सर्व युरोपियन राष्ट्र उठतात. आतां राष्ट्रांतील प्रत्येक व्यक्तीनें आपल्या राष्ट्रासाठीं, आपल्या स्वातंत्र्यासाठीं, परकीय सत्तेच्या मगरमिठींतून आपली सुटका करून घेण्यास तत्पर झालें पाहिजे अशा प्रकारचीं मतें प्रत्येक युरोपियन राष्ट्रांतील देशभक्त आपल्या देशबांधवांस प्रतिपादन करूं लागले. अशा रीतीनें नेपोलियनची सत्ता उलथून पाडण्याचा प्रत्येक राष्ट्र विचार करीत असतां नेपोलियनविरुद्ध चळवळ करण्यामध्यें प्रशियानें पुढाकार घेतला.