पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें. ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २४९ पाहून नेपोलियनला अर्थातच राग आला व त्यानें १८१२ च्या सुमारास आपलें सैन्य जमा करून रशियाची खोड मोडण्याच्या इराद्यानें त्यानें स्वतः रशियाच्या मोहिमेचें आधिपत्य घेतलें. यावेळीं नेपोलियन- जवळ पांच लाख सैन्य असून त्यांमध्यें नेपोलियनच्या विस्तृत साम्राज्यां- तील प्रत्येक राष्ट्राचे लोक होते ! या अवाढव्य सैन्याच्या मदतीनें नेपो- लियनला पहिल्याप्रथम एकसारखे जय मिळत गेले; व सप्टेंबर महिन्यांत तर नेपोलियननें रशियाची राजधानी में मास्को शहर तें काबीज करण्याचा घाट घातला ! मास्को शहरास आग. आपणास रशियाचा पूर्ण पराभव करितां येऊन झार अलेक्झांडर यास दांतीं तृण घेऊन शरण येण्यास लावतां येईल अशी नेपोलियनची कल्पना होती ! रशियन लोकांकडून आपणास आपल्या महत्त्वाकांक्षेत अडथळा यावयाचा नाहीं असें त्यास वाटत होतें. परंतु स्पेनप्रमाणें रशियां- तील लोकही जिवावर उदार होऊन लढण्यास तत्पर होते. नेपोलियन आपल्या सैन्यानिशीं मास्को शहरानजीक आला नाहीं तोंच माघार घेणाऱ्या रशियन सैन्यानें पूर्वी ठरल्याप्रमाणें त्या शहरास आग लावून तें पार उध्वस्त करून टाकलें ! मास्को शहर हातांतून जाणें म्हणजे फ्रेंच सैन्यानें लढाईत पूर्ण पराभव झाला असें कबूल करण्यासारखेंच होय ! त्यावेळेस भर हिंवाळा असल्यामुळें मास्कोखेरीज फ्रेंच सैन्यास विश्रांति घेण्यासारखें दुसरें स्थळच नव्हतें; व आतां तर रशियन सैन्यानें त्या शहरास आग लावून दिली असल्यामुळे फ्रेंच सैन्यानें आतां हिंवाळ्यासाठीं आश्रयास कोठें जावयाचें हा नेपोलियनपुढें प्रश्न पडला ! तेव्हां आतां परत फिरल्या- खेरीज गत्यंतरच नाहीं हें जाणून परत फिरण्याबद्दल नाइलाजास्तव त्यानें आपल्या सैन्यास हुकूम दिला. भर हिंवाळ्यांत पुढें जातां येणें शक्य नसल्यामुळे परत फिरणाऱ्या पांच लाख सैन्याचे काय हाल झाले असतील १६