पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण . नेपोलियननें आस्ट्रियाचें राज्य कां खालसा केलें नाहीं है नीट समजण्यास आपणास रशियाकडे नजर टाकली पाहिजे. टिलसीटच्या तहानें पश्चिमयुरोपवर आपले वर्चस्व स्थापावें असें ठरल्याने अर्थातच त्या दिशेकडे अलेक्झांडरच्या महत्त्वाकांक्षेस कांहींच वाव नव्हता ! व त्यानंतर अलेक्झांडरच्या संमतीनें सर्व युरोपियन राष्ट्रांच्या बंदरांतून इंग्लिश मालास बहिष्कार घालण्याचें ठरविल्यामुळे रशियास फारच अडचण सोसावी लागली. याशिवाय अलेक्झांडर यानें रशियन राज - कन्येबद्दल नेपोलियनच्या मागणीस अनुमोदन दिलें होतें, परंतु त्याप्रमाणें कांहींच करण्याचा अलेक्झांडरचा विचार नाहीं हें पाहून नेपोलियनला अलेक्झांडरचा राग आला. रशियाचा बादशहा आपला शत्रु होऊन आपणां दोघांमध्यें वैमनस्य आल्यास त्यास आस्ट्रि- याच्या मदतीची फारच आवश्यकता वाटत होती.. तेव्हां आस्ट्रियाचें राज्य जरी त्यास पूर्णपणे नाम- शेष करितां आलें असतें तरी नेपोलियननें तसें कांहींच न करितां आस्ट्रियाशीं सख्य संपादन केलें व आस्ट्रियाच्या राजाची मुलगी 'मेरिया लुईसी ' हिला मागणी घातली ! १८१० मध्यें नेपोलियनने आपल्या पहिल्या पत्नीस-जेसेफीनला - आपल्या राज्ञीपदावरून. काढून प्रसिद्ध हॅप्सबर्ग घराण्यांतील राजकन्येशीं- मेरिया लुईसी-मोठ्या. थाटानें विवाह केला. अलेक्झांडर व नेपो- लियन यांच्यामध्ये वितुष्ट येतें. 1. अलेक्झांडर व नेपोलियन यांच्यामधील वितुष्ट हलके हलके वाढ गेलें व १८१० च्या सुमारास या दोन बादशहांमध्ये मोठा खटका उड- ण्याची चिन्हें दिसूं लागलीं. ऑल्डेनबर्ग या संस्थानांतील राजा अलेक्झांडर- चा जवळचा आप्त असून त्याचें राज्य नेपोलियननें खालसा केलें व • नेपोलियनची रशि- यांतील मोहीम- १८१२. पश्चिम गॅलिशिया हा प्रांत खालसा करून तो.. प्रांत वार्साच्या संस्थानिकास दिलेला पाहून अले- क्झांडर चवताळला ! ३१ डिसेंबर १८९० मध्यें त्यानें एक जाहीरनामा काढून नेपोलियनच्या फर्मानाविरुद्ध आपलें धोरण जाहीर केलें. झारने काढलेला जाहीरनामा