पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५. वें. ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २४७ बरेंच सैन्य देऊन त्यास स्पेनमध्यें रवाना केलें. यावेळीं इंग्लिश सैन्याचें आधिपत्य ड्यूक ऑफ वेलिंगटन या नांवाजलेल्या सेनापतीस देण्यांत आलें असून त्यानें तर फ्रान्सचा पिच्छा पुरविण्याचाच विडा उचलला होता. स्पेनमध्यें नेपोलियनविरुद्ध व सर्व युरोपियन -राष्ट्रांचें स्वातंत्र्य हरण करून त्यांना गुलाम बनवून टाकण्याच्या त्याच्या -महत्त्वाकांक्षेविरुद्ध स्पॅनिश लोक मोठ्या शौर्यानें बंड करीत आहेत, ही वार्ता इतर युरोपियन राष्ट्रांस समजतांच त्यांच्या मनांतही नेपोलियन- विरुद्ध बंड करण्याची स्फूर्ति झाली, व हलके हलके युरोपांतील प्रत्येक -राष्ट्र योग्य संधि मिळण्याची मार्गप्रतीक्षा करूं लागलें. नेपोलियन स्पेनच्या मोहिमेंत गुंतला आहे, ही संधि पहातांच १८०८ च्या सुमारास बंड करण्याची ऑस्ट्रियानें तयारी चाल- विली. ही वार्ता नेपोलियनला मिळाल्यामुळे स्पॅनिश व इंग्लिश सैन्याचा पुरा मोड करण्यापूर्वीच आस्ट्रिया बंड कर- ण्यास उद्युक्त होतो - १८०८. त्यास आपल्या फौजेनिशीं ऑस्ट्रियाकडे कूच करावें लागलें. १८०९ च्या सुमारास स्पॅनिश व इंग्लिश सैन्यानें फ्रेंच सैन्यास जेरीस आणलें आहे असें समजतांच नेपोलियनाविरुद्ध जर्मनी- मधील सर्व संस्थानांस प्रवृत्त करण्याचा आस्ट्रियानें प्रयत्न केला; परंतु त्या वेळीं आस्ट्रियाच्या प्रयत्नास यश आलें नाहीं. आस्ट्रि- -यास इतर जर्मन संस्थानांकडून मदत न मिळाल्यामुळे नेपोलियननें सहज रीतीनें आस्ट्रियाचा बॅग्रामच्या लढाईत मोड करून त्यास चवथ्यांदां तह करावयास भाग पाडलें. व्हिएन्ना येथील तहानें आस्ट्रियास आणखी आप- ल्या कांहीं मुलखास मुकावें लागलें. नेपोलियनला या वेळीं आस्ट्रियाचा सर्वच प्रांत आपल्यास जोडून आस्ट्रियाचें राज्यच मोडून टाकतां आलें असतें, परंतु त्यावेळच्या एकंदर राजकीय परिस्थितीवरून दुबळ्या झालेल्या आस्ट्रियास जिवंत ठेवणेंच नेपोलियनला इष्ट वाटलें.