पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण नेपोलियनची ही अन्यायाची व जुलमाची कृति पाहून नेपोलियन- विरुद्ध सर्व स्पेन राष्ट्रास तिटकारा वाटू लागला. स्पेनमधील स्वदेशाभिमानी शूर वीरांस अर्थातच नेपोलियनच्या या अरेरावीच्या कृत्याची चीड येऊन त्यांनी गनिमी काव्याच्या पद्धतीनें फ्रेंच सैन्याचा पुरा मोड करून आपल्या मानेवरील फ्रेंच सत्तेचें जूं झुगारून देण्याचें ठरविलें ! अशाप्रकारें १८०८ "च्या मे महिन्याच्या सुमारास नेपोलियनवर चोहोंकडून अनर्थपरंपरा कोसळूं लागली व या अनर्थपरंपरेस आणखी भर घालण्यासाठींच की काय इंग्लंडनें या वेळीं स्पेनला मदत करण्याचे ठरविलें. फ्रान्सशी समुद्रावर टक्कर द्यावी असा इंग्लंडचा विचार होता, परंतु फ्रान्सच्या आरमाराच्या कमकुवतपणा- -मुळे इंग्लंडशीं समुद्रावर दोन हात करण्याचें नेपोलियनला धाडस झालें नाहीं. तेव्हां आतां जमिनीवरच नेपोलियनशीं युद्धप्रसंग करण्याचा इंग्लिश सैन्यानें विचार केला. १८०८ च्या मे महिन्यांत पोर्तुगॉल व स्पेन या दोन -राष्ट्रांस मदत करण्यासाठी इंग्लंडहून सैन्य रवाना करण्यांत आलें. फ्रान्सविरुद्ध अशारीतीनें युरोपियन राष्ट्रं एकामागून एक उठत असल्यामुळे यावेळीं नेपोलिय- -नला रशियाच्या स्नेहसंबंधाची फारच अवश्यकता होती; म्हणून त्यानें १८०८ आक्टोबरमध्यें अलेक्झांडरची भेट घेतली व रशियाकडून आपणास धोका येणार नाहीं अशी तजवीज करून घेतल्यावर तो स्वतः स्पेनच्या मोहिमेवर निघाला. त्याने लागलीच स्पॅनिश सैन्यास डोंगराळ मुलखांत हांकून - लावून इंग्लिश सैन्यास स्पेनच्या बाहेर पळ काढण्यास लावलें; व तो स्पेनमधून फ्रान्सकडे जाण्यासाठीं निघाला. नेपोलियन स्पेनमधून गेला. नाहीं तोंच स्पॅनिश सैन्य जमाव करून दऱ्याखोऱ्यांतून व डोंगराखाली उतरलें; व इंग्लिश सैन्यही स्पेनच्या किनान्यावर दाखल झालें. स्पॅनिश सैन्याचा पुरा मोड झाला नसून तें पुनः युद्ध करण्यास तत्पर झालें आहे ही बातमी ऐकतांच त्याची तळव्याची आग मस्तकास जाऊन 'पोहोंचली पण नेपोलियनला यावेळीं ऑस्ट्रियाकडील मोहिमेवर स्वतः जाव- -याचे असल्यामुळे त्यानें दुसऱ्या एका सेनापतीच्या हाताखाली