पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ . ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २४+ दील झाले. अशी युरोपमधील प्रत्येक राष्ट्राची स्थिति झाल्यामुळे या सर्व अनर्थपरंपरेचा उत्पादक जो नेपोलियन त्याच्या- विरुद्ध प्रत्येक राष्ट्र मनांतल्या मनांत जळ- फळूं लागलें. प्रत्येक राष्ट्राच्या मनांत नेपोलि- नेपोलियनच्या फर्माना- मुळे त्याच्या सत्तेस उतरती कळा लागते. यनची सत्ता उलथून पाडण्याचा विचार एक- समयावच्छेदेंकरून आला तर त्याच्याशी टक्कर देण्याचें सामर्थ्य नेपोलियनच्या अंगीं नव्हतें. नेपोलियनच्या फर्मानाविरुद्ध आपली नाखुषी दाखविण्याचे धारिष्ट पहिल्याप्रथम छोट्या पोर्तुगॉलनें केलें. नेपोलियनला ही वार्ता समजतांच पोर्तुगीज बंदरें आपल्या ताब्यांत घेण्यासाठीं त्यानें पोर्तुगालमध्ये सैन्य रवाना केलें. या सैन्याशीं टक्कर देण्याचें सामर्थ्य लहानशा पोर्तुगालमध्यें नसल्याने पोर्तुगालच्या राजानें ब्राझीलकडे पळ काढला. पोर्तुगाल नंतर स्पेन देशही पूर्णपणें आपल्या हुकमतीखालीं आणावा असें नेपोलियनला वाटूं लागलें. फ्रान्स व स्पेन या दोन देशांचे संबंध १७९५ पासून विशेष सलोख्याचे होते. स्पेनचा राजा चार्लस यानें नेपोलियनशीं सख्य संपादन केलें असून, नेल्सनच्या विरुद्ध ट्रॅफल्गार येथें लढण्यासाठीं आपलें आरमारही त्यानें फान्सच्या ताब्यांत दिलें होतें; व त्या लढाईत त्याच्या आरमाराचा विध्वंस झाला. अशा रीतीनें स्पेननें स्वतःचें नुकसान करूनही फ्रान्सला मदत केली होती, तरी देखील स्पेनचें राज्य पूर्णपणें आपल्या हुकमतीखाली आणण्याचा विचार नेपोलियननें. सोडला नाहीं. १८०८ च्या सुमारास स्पेनचा राजा व राजपुत्र यांच्यामध्यें चाललेल्या कलहाचा फायदा घेऊन त्या कलहाचा योग्य निकाल लाव- यासाठीं त्यानें त्या पितापुत्रांस फ्रान्समध्यें बोलाविलें; व तेथें आल्यावर त्या दोघांनाही स्पेनच्या गादीवरील आपला हक्क सोडण्यास लावलें.. अशा रीतीनें स्पेनचं राज्य बळकावून त्यावर आपला भाऊ जोसेफ यास बसविलें व स्पेनच्या ताब्यांत असलेला नेपल्स हा प्रांत आपल्या मेव्हण्याच्या ताब्यांत दिला !