पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ इंग्लंडचा व्यापार- विषयक कोंडमारा करण्याचा प्रयत्न. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण छोट्या राष्ट्रास जेरीस आणण्यासाठी काय करावें हें त्यास समजेना ! इंग्लंडचें समुद्रावरील वर्चस्व व्यापारावर व त्या व्यापारानें पोसलेल्या आरमारावर अवलंबून आहे, तेव्हां इंग्लंडचा परदेशांशीं असलेला व्यापारच बंद ठेवण्याचा आपण प्रयत्न केला तर इंग्लंडचें समुद्रा- वरील वर्चस्व नष्ट होईल या समजुतीनें त्यानें इंग्लंडचा व्यापारविषयक बाबतींत कोंडमारा करण्याचा बेत केला ! १८०६ मध्यें नेपोलियन बर्लिन शहरी असतांना इंग्लिश माल फ्रेंच किंवा फ्रान्सच्या हुकमतीखालीं असलेल्या कोणत्याही राष्ट्रांतील बंदरामध्यें न येऊं देण्याविषयीं व कोठें सांपडल्यास तो जप्त करून टाकण्याविषयीं त्यानें फर्मान सोडलें. यानंतर 'टिलसीट येथे रशियाचा बादशहा अलेक्झांडर याच्या संमतीनें युरोपमधील प्रत्येक राष्ट्रानें आपल्या फर्मानाप्रमाणें चालून इंग्लंडचा व्यापारविषयक कोंडमारा करण्यांत यावा असें ठरविलें. नेपोलियनच्या या फर्मानास 'जशास तसें ' या न्यायानें प्रत्युत्तर देण्यासाठीं युरोपच्या सर्व बंदरांवर नाकेबंदी करून बाहेरून युरोपियन राष्ट्रांस कोण- ताच माल जाऊं द्यावयाचा नाहीं असें इंग्लंडनें ठरविलें ! समुद्रावर इंग्लंडचें वर्चस्व असल्या- " नेपोलियनला इंग्लं- डचे प्रत्युत्तर. मुळे अर्थातच इंग्लंडला युरोपची नाकेबंदी करितां येऊन नेपोलियनचें फर्मान मात्र त्याच्या स्वतःच्याच गळ्यांत आलें ! orders in Counal इंग्लंडशीं व्यापार करण्यास प्रतिबंध करण्यासाठीं नेपोलियननें सोडलेल्या फर्मानापासून त्याच्या सत्तेस उतरती कळा लागली असें म्हण- हरकत नाहीं. नेपोलियनच्या फर्मानामुळें युरोपचा पर- राष्ट्रांशी असलेला व्यापार इंग्लंडच्या नाकेबंदीनें थांबला व सर्वत्र दुष्काळ पडण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. सर्व लोक हवाल- ण्यास