पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २४३. अप्रत्यक्ष रीतीनें त्याच्या अंमलाखालीं होतीं. अशा रीतीनें पश्चिम व मध्ययुरोपवर त्याचें वर्चस्व असून पूर्वेकडे आपले वर्चस्व स्थापणाऱ्या अलेक्झांडरशीं त्याचा स्नेहसंबंध होता. अशारीतीनें जवळ जवळ सर्व युरोपवर त्यानें आपलें वर्चस्व स्थापलें होतें तरी नेपोलियनसारख्या मह- त्वाकांक्षी बादशहाच्या मनांत अजून एक गोष्ट लागून राहिली होती; व ती गोष्ट म्हणजे इतकें सर्व झालें तरी पश्चिमेकडील एका लहानशा बेटांतील राष्ट्रानें- इंग्लडनें - आपले वर्चस्व कबूल केलें नव्हतें हीच होय ! - इंग्लंडचा पराभव करून त्यास आपले वर्चस्व कबूल करावयास लावावें अशी नेपोलियनची बरेच दिवसांपासूनची महत्त्वाकांक्षा होती; व ती महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी योग्य संधि मिळण्याची तो मार्ग- नेपोलियनची महत्त्वाकांक्षा. प्रतीक्षा करीत होता. अमीन्सच्या तहानंतर एका वर्षानेंच इंग्लंड व फ्रान्स यांमध्यें वैमनस्य उपस्थित झालें;व आक्टोबर १८०५ मध्यें नेपोलियन व्हिएन्ना- कडे कूच करीत असतां नेल्सननें ट्रॅफलगारजवळ फ्रान्स व स्पेन या संयुक्त आरमाराचा पराभव केला होता. या ठिकाणीं ब्रिटिश आरमारास जय संपादन करून दिल्यावर नेल्सन मरण पावला. फ्रान्स व स्पेन या संयुक्त आरमाराचा पराभव झाल्यावर इंग्लंडशीं समुद्रावर झुंज करण्यास कोणतेंच आरंमार धजावत नसे. आज व्हिएन्ना तर उद्यां सेंट पीटर्सबर्ग अशा रीतीनें नेपोलियन आपल्या फौजेनिशीं कूच करीत असल्यामुळे सर्व लोक नेपोलियनला घाबरून जात; तरी नेपोलि- यनची हुकमत जमिनीवरच चालत असल्यानें ती उत्तर समुद्राच्या किना- यावर येतांक्षणीं थबके. समुद्रावर इंग्लंडच्या आरमाराशीं टक्कर देण्यास फ्रान्सचें आरमार अगदींच असमर्थ होतें. तेव्हां इंग्लंडसारख्या समुद्रवेष्टित