पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण १८०५ ), व ऑस्ट्रियाचा राजा २ रा फॅन्सीस यास दांतीं तृण घेऊन तह करावयास लावलें ! या प्रेसबर्गच्या तहानें आस्ट्रियास व्हेनीस प्रांतास मुकावें लागलें व तदनंतर तो प्रांत इटलीच्या राज्यास जोडण्यांत आला. तद्वतच • ऑस्ट्रियाच्या ताब्यांतील ट्रॉल हा प्रांत बव्हेरियाच्या संस्थानिकास देण्यांत आला. याचवेळीं बव्हेरिया व वर्टेमबर्ग हीं दोन दक्षिणेकडील जर्मन संस्थानें 'पवित्र रोमन पातशाहीपासून' अलग करण्यांत येऊन त्यांचीं स्वतंत्र राज्यें बनावण्यांत आलीं. हीं दोन जर्मन संस्थानं स्वतंत्र झाल्यास जर्मनी- तील आस्ट्रिया व प्रशिया यांचे वाढलेलें प्रस्थ कमी होईल असें वाटून नेपोलियननें हाईन नदीच्या आसपास असलेल्या लहान लहान संस्थानांचा एक राष्ट्रीय संघ केला व त्या संघाचे स्वातंत्र्य रक्षण करण्याची स्वतःकडे हमी घेतली (१८०६ ) ! नेपोलियनच्या नेतृत्वाखालीं हा संघ स्थापन झाल्यावर अर्थातच जर्मनीच्या व ' पवित्र रोमन पातशाही'च्या घटनेत मोठी क्रान्ति झाली. दक्षिण व पश्चिम जर्मनींतील संस्थानांनी, पातशाहीपासून अलग असलेला आपला स्वतःचा संघ निर्माण करून फ्रेंच नेपोलियनचें वर्चस्व कबूल कल्यावर आज हजार वर्षे सर्व जर्मनीवर हुकमत चालविणाऱ्या 'पवित्र रोमन पातशाही' चें अस्ति- त्वच नष्ट झाल्यासारखें झालें ! रोमन साम्राज्याच्या निरनिराळ्या घटकावयवांनीं आपलें स्वातंत्र्य प्रस्था- पवित्र रोमन साम्राज्याचा अस्त - १००६. पित केल्याची वार्ता कानीं येतांच बादशहा २ रा फॅन्सीस यानें 'पवित्र रोमन साम्राज्याचा बादशह।' हा नामधारी किताब टाकून देऊन 'आस्ट्रियाचा बादशहा' असा नवीनच अपरिचित किताब धारण केला ! नेपोलियनच्या प्रेरणेनें स्थापन जर्मनीमधील वर्चस्वास बाध येऊं लागला. झालेल्या संघामुळें प्रशियाच्या १७९६ सालीं झालेल्या बॅस्ले- च्या तहानंतर प्रशियानें आपलें तटस्थ धोरण ठेवून फ्रान्सविरुद्ध स्थापन झालेल्या युरोपियन राष्ट्रांच्या संघांत भाग घेतला नव्हता. परंतु आतां नेपो-