पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें . ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २३९ लंबून असणाऱ्या सर्व लोकसत्ताक राज्यांचेंही अस्तित्व संपुष्टांत येऊन तेथें राजसत्ता स्थापन करण्यांत आली ! फ्रान्सच्या प्रयत्नानें ह्या निरनिराळ्या लोकसत्ताक राज्यांतील जनतेस स्वराज्याचे हक्क मिळाले होते, परंतु आतां खुद्द फ्रान्समधील लोकांनीं जेव्हां राजसत्तेचें जूं आपल्या मानेवर घेण्याचे कबूल केलं, तेव्हां अर्थातच फ्रान्सवर अवलंबून असलेल्या व फ्रान्सच्या नमुन्या- बरहुकूम निर्माण करण्यांत आलेल्या प्रजासत्ताक संस्थानांतील लोकांनी राजसत्तेचें जूं आपल्या मानेवर घेण्यावांचून गत्यंतर नव्हतें. नेपोलियनच्या आज्ञेनें हॉलंडमध्ये स्थापण्यांत आलेलें 'बेटेव्हियन लोक- सत्ताक राज्य ' मोडण्यांत येऊन हॉलंडच्या गादीवर नेपोलियनचा भाऊ लुई बोनापार्ट यास वसविण्यांत आलें. त्याचप्रमाणें इटलीमध्यें स्थापन झालेलें ' सिसल्पीन' लोकसत्ताक राज्य मोडून टाकण्यांत आलें व इटलीमध्ये राजसत्ता स्थापण्यांत येऊन नेपोलियननें १८०५ च्या मे महि- न्यांत स्वतःस मीलन येथें राज्याभिषेक करून घेतला ! नेपोलियननें अशाप्रकारें लोकसत्ताक राज्यें मोडून तेथें आपल्या नातलगांस बसविण्याचा सपाटा चालविला, तेव्हां त्याच्या हेतूबद्दल युरो- पियन राष्ट्रांच्या मुत्सद्यांस साहजिकच शंका येऊं लागली. जगांत शांतता रहावी असा नेपोलियनचा हेतु नसून सर्व जग पादाक्रांत करण्याचीच त्याची महत्त्वाकांक्षा आहे, व आपली महत्त्वाकांक्षा सफल होण्यासाठी योग्य संधी- चीच तो मार्गप्रतीक्षा करीत आहे अशी सर्वांस शंका येऊं लागली. १८०३ च्या सुमारास नेपोलियननें ' बोलाँग ' येथें इंग्लंडवर हल्ला करतां यावा म्हणून आरमार बांधण्यांस सुरुवात केलेली पाहून ब्रिटिश मुत्सयांनीं नेपोलियनविरुद्ध ऑस्ट्रिया व रशिया या दोन राष्ट्रांशी फ्रान्स- विरुद्ध संघ स्थापन करण्याविषयीं बोलणें लावलें. नेपोलियनला या गोष्टीची वार्ता लागतांच त्यानें इंग्लंडवर आरमारी हल्ला करण्याचा विचार सोडून देऊन युरोपमधील इतर राष्ट्रांचा समाचार घेण्याचा निश्चय केला; व लागलींच त्यानें मोरव्हिया प्रांतावर स्वारी करून' अस्ट्रेलिट्झ' येथें ऑस्ट्रिया व रशिया यांच्या संयुक्त सैन्याच्या पराभव केला ( डिसें. फ्रान्सविरुद्ध युरो- पियन राष्ट्रांचा तिसरा संघ - १८०५. .