पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ . ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २४१ लियननें राशिया व ऑस्ट्रिया या दोन बलाढ्य राष्ट्रांचा पुरा मोड केला नेपोलियनचें प्रशि- याशीं युद्ध - १८०६. असल्यामुळें प्राशयाच्या तटस्थपणाची कांहींच अवश्यकता नव्हती, व आतां युरोपियन राष्ट्रांचा पराभव झाल्यामुळें प्रशियाचें वर्चस्व कमी कर- ण्याची ही उत्तम संधि आहे हें जाणून नेपोलियननें प्रशियाशी युद्ध जाहीर केलें ( १८०६ ). नेपोलियननें आतांपर्यंत केलेल्या मोहिमेपेक्षां १८०६ मधील मोहीम विशेष प्रसिद्ध आहे. एका महिन्याच्या आंत त्यानें प्रशियन सैन्याचा 'येना'च्या लढाईत पराभव करून बर्लिन शहरांतून प्रशियाचा राजा फ्रेडरीक वुइल्यम यास हाकून लावलें, तेव्हां आपल्या कांहीं थोड्या सैन्यानिशीं फेडरीक वुइल्यम रशियाच्या आश्रयास गेला. आतांपर्यंत नेपोलियननें सर्व मध्ययुरोपवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलें होतें; परंतु आतां रशियाचा बादशहा अलेक्झांडर ( १८०१ - १८२५ ) यानें फेडरीक वुइल्यमला आश्रय दिल्यामुळे रशियाचा समाचार घेण्यासाठीं नेपोलियननें राशियावर स्वारी करण्याचा निश्चय - रशिया विरुद्ध मोहिम - केला. १८०७ मध्यें फीडलंड या ठिकाणीं रशियन सैन्यावर जय मिळविल्यावर रशियाचा बादशहा १८०७. अलेक्झांडर तह करण्यास तयार झाला. अलेक्झांडरला नेपोलियनबद्दल बराच आदर वाटत होता, व आतां . फीडलंडच्या लढाईत रशियन सैन्याचा पराभव झाल्यावर तहाची वाटा- घाट करण्यासाठीं जेव्हां दोन्ही बादशहांची निमेन नदीमध्ये एका लहानशा बोटीमध्यें भेट झाली त्या वेळीं नेपोलियानची तेजस्वी मूर्ति व लोकोत्तर बुद्धिमत्ता यांची छाप अलेक्झांडरवर सहाजिकच बसली ! या दोन बादशहांच्या मुलाखतीच्या वेळीं प्रशियाचा राजा फ्रेडरीक वुइल्यमही हजर होता. त्यावेळी झालेल्या मुलाखतीचें पर्यवसान टिलसीटच्या तहामध्यें झालें. या तहान्वयें रशियास फ्रान्सकडून आपला गमावलेला सर्व मुलूख परत