पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ नेपोलियन ' बादशहा असा किताब धारण करतो - २ डिसेंबर १८०४. , युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण फ्रान्सच्या अंतर्व्यवस्थेसंबंधीं वर सांगितलेल्या सुधारणा करून व त्या सुधारणांस योग्य फळें आलेलीं पाहून नेपोलियन थांबला असता तर त्यास फ्रान्सचें एक संघटित, सुव्यवस्थित व बलाढ्य राष्ट्र बनवितां आलें असतें. परंतु वर सांगितलेली अंतस्थ सुधारणा करून व त्याचीं फळें. स्वस्थपणें चाखीत बसणें नेपोलियनला आवडलें नाहीं ! प्राचीनकाळीं अलेक्झांडर बादशहानें केलेले पराक्रम आपणही करून सर्व पृथ्वी पादा- क्रांत करावी व रोमन पातशाहीचा पराक्रमी बादशहा जो ऑगस्टस त्याच्याप्रमाणें आपली कीर्ति दिगंत पसरावी अशी नेपोलियनची महत्त्वाकांक्षा होती ! १८०० मध्यें डिरेक्टरीची सत्ता उलथून पाडल्यावर त्यानें ' कॉन्सल' अथवा ' लोकांनी निवडलेला मुख्य अधिकारी ' असा किताब धारण करून आपल्या हातांत राज्यकारभाराचीं सर्व सूत्रें केंद्रीभूत केलेलीं होतीं ! परंतु 'कॉन्सल' या किताबानें त्याचें समाधान होईना ! तेव्हां वस्तुतः पहातां तो नांवानें नसला तरी खरोखरीच फ्रान्सचा बादशहा होता, तरी आपल्या अंगावर असलेलें कॉन्सल या पदवीचें पांघरूण काढून टाकून १८०४ च्या महिन्यांत त्यानें फ्रेंचांचा बादशहा असा बहुमानदर्शक किताब धारण केला; व त्याच वर्षी डिसेंबर महिन्यांत मोठ्या समारंभानें पॅरीस शहरी 'नॉट्रेडेम ' या चर्चमध्यें आपणास व आपली पत्नी जोसेफीन हिला मोठ्या थाटाने राज्याभिषेक करून घेतला ! अशा रीतीनें गेलीं पांच वर्षे कान्समध्यें नांवाला असलेली 'लोकसत्ताक राज्यपद्धति' नाहींशी होऊन आतां पुनरपि केंद्रीभूत झालेली 'राजसत्ता' प्रस्थापित झाली ! फ्रेंच पातशाही. (१८०४ - १८१५ ) मे फ्रान्समधील लोकसत्ताक राज्य नष्ट होऊन नेपोलियनच्या राज्याभिषेकानें तेथें राज्यसत्ता स्थापन झाल्यावर फ्रान्सवर अव-