पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें. ] फ्रान्सचे लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २३५ चा त्यानें निश्चय केला. मोरो नांवाच्या प्रसिद्ध सेनापतीच्या हाताखालीं बरेंच सैन्य देऊन त्यास नेपोलियननें जर्मनीमध्यें असलेल्या आस्ट्रिया- च्या मुलुखावर स्वारी करण्यासाठी पाठविलें, व इटलीमधील आस्ट्रियाचें पुनरपि प्रस्थापित झालेलें वर्चस्व नष्ट करण्यासाठीं तो स्वतः इटलीच्या -मोहिमेवर निघाला. आपल्या सैन्यानिशीं जोरानें चाल करून त्यानें अकस्मात् रीतीनें आस्ट्रियन सैन्याच्या पिछाडीवर हल्ला करून शत्रूस सेंट बर्नार्डच्या चिंचोळ्या घाटामध्यें अडकावून ठेवलें. नंतर लागलीच मरेंगो येथील लढाईत ( १४ जून १८०० ) त्यानें आस्ट्रियन सैन्याचा पूर्ण पराभव करून इटलीवर आपले वर्चस्व बसविलें. या खेपेसही आस्ट्रियाचा राजा व पवित्र रोमन पातशाहीचा बादशहा २ रा फॅन्सीस यास फ्रेंच सैन्याचे श्रेष्ठत्व कबूल करावें लागलें. ल्यूनेव्हीलच्या तहांत त्यानें कँपो- ल्यूनेव्हीलचा तह - १८०१. फोर्मीयोच्या तहांतील सर्व अटी कबूल करून व्हाईन नदीच्या पश्चिमेचा मुलूख फ्रान्सला दिला. या तहानें पुनरपि फ्रान्सचें इटलीवर वर्चस्व स्थापलें जाऊन 'सिसल्पीन' व 'लिगुरियन' हीं दोन लोकसत्ताक संस्थानें फ्रान्सच्या हुकमतीखाली आली. अशारीतीनें आस्ट्रियाचा पराभव केल्यावर फ्रान्सविरुद्ध स्थापन झालेल्या संघापैकीं एकटें इंग्लंड राष्ट्र कायतें फ्रान्सकडून पराभूत झालेलें अमीन्सचा तह १८०२. नव्हतें. तेव्हां इंग्लंडसारख्या आरमारी राष्ट्रास पराभूत कसें करावयाचें हा नेपोलियनपुढें मोठा प्रश्न होता ! फ्रान्सचें आरमार ही कामगिरी बजा- विण्यास अगर्दीच असमर्थ होतें, व पुन: इजिप्तमध्ये शिरून शत्रूस शह देण्याचा प्रयत्न सिद्धीस जाणार नाहीं असें त्यास वाटूं लागलें ! तेव्हां इंग्लंडचा पराभव करणें सध्यां शक्य नसल्यामुळे इंग्लंडशीं तह करावा व आपली अंतस्थ सुधारणा करून राष्ट्रांतील अव्यवस्था दूर करावी.