पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ युरोपचा अर्वाचीन इतिहास [ प्रकरण लागलें ! डिरेक्टरी उलथून पाडल्यावर, पूर्वीच्या रोमन साम्राज्यांतील केंद्रीभूत झालेल्या पद्धतीचें फ्रान्समध्यें अनुकरण करावें, व कॉन्सल- लोकप्रतिनिधि-या नात्यानें सर्वत्र आपला दरारा बसवावा असें नेपो- लियनला वाटूं लागलें; व आपल्या कांहीं मित्रांचा सल्ला घेऊन फ्रान्स- मध्यें तसली राज्यपद्धति स्थापण्याचें त्यानें निश्चित केलें. परंतु अशी केंद्रीभूत झालेली राज्यव्यवस्था स्थापन करतांना लोकनियंत्रित राज्य- पद्धतीस अजीबात फांटा देणे योग्य नव्हे असें वाटून कायदे करण्यासाठीं ट्रिब्यूनेट' व 'कायदे करणारें मंडळ' अशा दोन सभा निर्माण कर- ण्यांत आल्या. परंतु या सभांस देण्यांत आलेल्या अधिकारावरून या सभा केवळ दिखाऊच आहेत असा कोणींही तर्क केला असता ! कारण, — ट्रिब्यूनेट' या सभेस आपल्या पुढें येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाबद्दल चर्चा करण्याचाच अधिकार असून मत देण्याचा अधिकार नव्हता, व त्याच - प्रमाणें 'कायदे करणारें मंडळ' या सभेस आपल्यापुढें येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर चर्चा करण्याचा अधिकार नसून फक्त मत देण्याचाच अधिकार होता. अशा प्रकारें या दोन्ही सभांची सत्ता निरनिराळ्या मार्गांनीं हिरावून घेतल्यामुळे या सभांचें कांहींच वजन पडणें शक्य नव्हतें ! फ्रान्समधील अंमलबजावणीच्या खात्यावर या सभांची हुकमत अशा रीतीनें केवळ दिखाऊच असल्यामुळें नेपोलियनला, कॉन्सल ( लोकांनीं निवडलेला मुख्य अधिकारी ) या पदाबद्दल बादशहा है पद सहज धारण करितां येण्या- सारखे होतें ! परंतु सध्यां फ्रान्सच्या अंतर्व्यवस्थेपेक्षां इतर राष्ट्रांशीं तोंड देणें फ्रान्सला जरूर होतें. या नवीन होणाऱ्या युद्धाच्या प्रारंभींच रशियानें युरोपियन राष्ट्रांच्या संघांतून आपलें नांव काढून घेतल्यामुळे फ्रान्सला आतां फक्त आस्ट्रिया व इंग्लंड यांच्याशींच युद्ध करावयाचें होतें. १७९६ च्या वेळच्या परिस्थिती- प्रमाण सध्यांही फ्रान्सची परिस्थिति होती, तेव्हां त्या वेळेप्रमाणेंच आस्ट्रियावर जर्मनींत व इटलींत एकदम स्वारी करण्या- इटलीमध्यें नेपो- लियनची दुसरी स्वारी.