पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण असें वाटून 'एकमेकांचीं घेतलेली ठिकाणें परत मिळावीत' अशा अटीवर १८०२ मध्ये त्यानें अमीन्स येथें इंग्लंडशी तह केला. फ्रान्सच्या अंतर्व्य- गेलीं दहा वर्षे शत्रूशीं एकसारखी झुंज करावी लागल्यामुळे फ्रान्सला स्वस्थता मिळाली नव्हती. परंतु आतां स्वस्थता मिळाल्यावर नेपोलियनला फ्रान्सच्या अंतर्व्यवस्थेत पाहिजे त्या सुधारणा करून घेणें शक्य झालें.. गेल्या दहा बारा वर्षांत फ्रान्सच्या राज्यव्यवस्थेची व अंतर्व्यवस्थेची घडी पार विस्कटून गेली असल्यानें राज्यकार- भाराचा गाडा सुव्यवस्थित रीतीनें पुन: सुरू करण्या- च्या कामी मोठमोठ्या खंबीर मुत्सयांनी देखील. हात टेंकले असते. फ्रान्सच्या अंतर्व्यवस्थेत सुधा- रणा करणें म्हणजे फ्रान्सच्या सर्व खात्यांचीच नवीन पायावर उभारणी करण्यासारखं होतें. परंतु इतकें अवघड काम होतें, तरी देखील नेपोलियननें शांतपणें सर्व गोष्टींचा विचार करून ज्या सुधारणा अम- लांत आणल्या त्यायोगें फ्रान्सच्या राज्यक्रान्तीनें बिघडलेली घडी त्यानें वस्थेत महत्त्वाच्या सुधारणा. नीट बसविली. केंद्रीभूत झालेली पहिल्याप्रथम नेपोलियननें राज्यव्यवस्थेसंबंधीं केलेल्या सुधारणांचा आपण विचार करूं. गेल्या दहा वर्षांत फ्रान्सच्या राज्यव्यवस्थेच्या कार- भारांत सर्वत्र गोंधळ माजून राहिला होता. हा गोंधळ नाहींसा करून 'टाकण्यासाठी नेपोलियननें फ्रान्सचे सारखे विभाग करून त्या प्रत्येकावर सुभेदार ( प्रिफेक्ट ) नेमले. या अधिकाऱ्यांची नेमणूक खुद्द नेपोलियनकडून होत असून त्यांना आपल्या सुभ्यांच्या राज्यव्यवस्थेसंबंधानें सर्व प्रकारचे अधिकार देण्यांत आले होते. अशाप्रकारची केंद्रीभूत झालेली राज्यव्यवस्था अमलांत येऊन फ्रान्समधील गोंधळ जरी नाहींसा झाला तरी त्यामुळे फ्रेंच राज्यक्रान्तीनें जनतेच्या मनांत उद्भूत झालेल्या स्वरा- ज्याच्या कल्पना मात्र चेपून गेल्या ! परंतु यावेळी फ्रेंच जनतेस स्वरा- राज्यव्यवस्था.