पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५. ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २३३ आपल्या कांहीं अनुयायांसह फ्रान्समध्ये परत येण्यास सांपडलें ही वार्ता देखील कोणास नव्हती ! परंतु आतां फ्रान्सविरुद्ध इतर युरोपियन राष्ट्रांनीं युद्ध जाहीर केलें असल्यामुळे सर्व राष्ट्रास नेपोलियनच आतां आपला त्राता आहे असें वाटल्यास नवल नव्हतें ! नेपोलियनच्या शौर्याची सर्व राष्ट्रास खात्री पट- लेली होती व आतां डिरेक्टरी मंडळांतील सभासदांमध्यें असलेली फूट पाहून नेपोलियनला च सर्वजण आपला पुढारी समजूं लागले ! आपल्यावर सर्व राष्ट्राचा विश्वास आहे, व आपणास लोकांचें पाठ- बळ आहे हें कळून चुकल्यावर आपणास डिरेक्टरी मंडळ तत्काळ मोडून टाकतां येऊन सर्व सत्ता आपल्या हातांत घेतां येईल असें नेपोलियनला साहजिकच वाटूं लागलें ! आपला हेतु सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करीत असतां, पांचशें सभासदांच्या कायदे करणाऱ्या सभासदांकडून त्यांस विरोध करण्यांत आला, परंतु नेपोलियनच्या मदतीस फ्रेंच सैन्य तत्पर असल्या- मुळें त्यास या कामी विशेष कांहींच अडथळा आला नाहीं. अशा रीतीनें ९ नोव्हेंबर १७९९ मध्यें डिरेक्टरीची सत्ता संपुष्टांत आली ! नेपोलियननें कॉम्सलर राज्यपद्धति. ( १७९९ - १८०४ ). डिरेक्टरीची सत्ता उलथून पाडल्यावर त्यास पाहिजे तशी फ्रान्सच्या राज्यव्यवस्थेची घटना तयार करून त्यांमध्यें स्वतःस महत्त्वाची जागा घेतां येणें शक्य होतें ! गेली दहा वर्षे फ्रान्स- मध्यें चाललेल्या बेबंदशाहीस कंटाळून पुनरपि केंद्रीभूत झालेली राज्य-. व्यवस्था स्थापन झाल्यास लोकांस हवीच होती. 'स्वातंत्र्य, समता, विश्व- बंधुत्व' हीं तत्त्वें प्रतिपादन करणाऱ्या क्रान्तिकारक मंडळीच्या जुलमी राज्यपद्धतीचा लोकांस तिटकारा वाटूं लागला होता; व पुनरपि १४ व्या लुईप्रमाणें नेपोलियननें जरी आपली सत्ता अनियंत्रित व केंद्रीभूत केली तरी गेल्या दहा वर्षांतल्या बेबंदशाहीपेक्षां ती फार बरी असें सर्वास वाटू १५