पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरणः च्या सर्व शत्रूंचा पराभव होऊन फ्रान्सला स्वस्थता मिळाली होती; इतकेंच नव्हे, तर केवळ एका मोहिमेंत नेपोलि- नेपोलियनचा गौरव. यननें फ्रान्सच्या वर्चस्वाखालीं विस्तृत मुलूख आणून फ्रान्सचा दरारा सर्वत्र पसरला असल्यामुळे 'राष्ट्रीय योद्धा' म्हणून त्याचा गौरव होऊ लागला. आपल्या पराक्रमानें नेपोलियन फ्रान्समध्ये एवढा प्रसिद्धीस ये असें त्याच्याविषयीं लहानपणीं कोणीच भाकीत केलें नसतें ! फ्रान्सच्या दक्षिणेस असलेल्या कार्सिका बेटांत १७६९ सालीं त्याचा जन्म झाला. याच वेळीं हें बेट जेनोआ संस्थानाकडून फ्रान्सनें घेतलें असून, त्या बेटावर आपलें वर्चस्व पूर्णपणें बसविण्याचा फ्रान्सचा प्रयत्न चाललेला होता. यावेळीं नेपोलियन लहान असून त्यास फ्रेंच लोकांच्या कृतीबद्दल मोठा तिटकारा वाटे, व त्याच्या सर्व बाल्यावस्थेत फ्रेंच लोकांबद्दलचा त्याचा तिटकारा कायम राहिला. फ्रान्समधील राज्यक्रान्तीनें नेपोलियनची महत्त्वाकांक्षा जागृत झाली, व आपल्या आंगच्या लष्करी कौशल्यानें पुढें येण्यास त्यास वाव मिळाला- पहिल्याप्रथम टूलॉनच्या वेढयाच्या वेळीं व दुसऱ्यांनदां पॅरिस शहरीं झालेल्या दंग्याच्या वेळीं आपल्या अंगच्या हिंमतीनें तो पुढें आला; व आतां तर आस्ट्रियाच्या राजाकडून कॅम्पो फोर्मियो हा तह करविण्यास नेपोलियनचे एकट्याचे परिश्रम कारणीभूत झाल्यामुळें नेपोलियनबद्दल सर्व फ्रेंच लोकांस साहजिकच आदर वाटूं लागला. नेपोलियनचें पूर्ववृत्त. फ्रान्समध्यें डिरेक्टरी स्थापन झाल्यापासून थोडक्याच काळांत फ्रान्सने इंग्लंडखेरीज आपल्या सर्व शत्रूंचा पराभव केला होता; परंतु इंग्लंडचा मात्र आपणास पराभव करितां येत नाहीं ही गोष्ट त्यांना स्वस्थता देत नव्हती ! १७९८ च्या सुमारास इंग्लंडचा पराभव कसा करावयाचा याविषयी वाटाघाट करण्यांत आली. फ्रान्सजवळ बलाढ्य आरमार नसल्यामुळे इंग्लंडवर हल्ला करितां येणें शक्य नव्हतें. तेव्हां इंग्लंडवर