पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें. ] फ्रान्सचे लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २३१. प्रत्यक्षरीतीनें हल्ला करितां आला नाहीं, तरी अप्रत्यक्षरीतीनें इंग्लंडचा पराभव करण्याचें डिरेक्टरीने ठरविलें. इंग्लंडच्या ताब्यांत असलेली ठिकाणें व वसाहती यांवर हल्ला करून तीं काबीज केल्यास अर्थातच इंग्लंडला पराभव कबूल करावा लागेल असे वाटून गुप्तरीतीनें एक लहानसें आरमार इंग्लंडला इजिप्तमध्ये शह देण्याचा नेपोलिय- नचा घाट १७९८. त्याचें आधिपत्य नेपोलियनला देण्यांत आलें. फ्रान्सकडून चाललेल्या तयारीची वार्ता इंग्लिश आरमाराचा सेनापति नेल्सन यास मिळून फ्रान्सच्या प्रत्येक हालचाली तो डोळ्यांत तेल घालून पाहूं लागला. परंतु नेल्सनला चुकवून १७९८ सालीं नेपोलियनला इजिप्तमध्यें आपल्या सैन्यानिशीं जातां आलें. इजिप्त हा प्रांत त्यावेळीं तुर्कस्थानच्या ताब्यांत असून लष्करी दृष्टीनें फारच महत्त्वाचा होता. इजिप्तवर वर्चस्व स्थापल्यावर हिंदुस्थान व पूर्वेकडील प्रदेश यांवर हल्ला करून इंग्लंडला शह देतां येईल असें नेपोलियनला वाटत होतें.. अशारीतीनें इजिप्तवरील वर्चस्व लष्करीदृष्टीने फारच महत्त्वाचें असल्या- मुळे नेल्सनला जेव्हां नेपोलियनच्या हालचालीची वार्ता समजली तेव्हां तो तत्काळ इजिप्तकडे आपल्या आरमारासह निघाला. परंतु नेल्सन तेथें जाण्यापूर्वीच नेपोलियननें इजिप्तची राजधानी अलेक्झांड्रा या शहरीं उतरून फ्रेंच सैन्याचा तळ दिला होता. तेव्हां आतां काय करावें असा नेल्सनला विचार पडला; परंतु त्यानें न डगमगतां, फ्रेंच आरमाराचा आपणास पराभव करितां आला तर नेपोलियनच्या हाताखालील फ्रेंच सैन्याचा व फ्रान्सचा संबंध तुटेल व नेपोलियनला फ्रान्सकडून वरचेवर कुमक मिळणार नाहीं असें वाटून त्यानें आपला मोर्चा फ्रेंच आरमाराकडे. वळविला व ता. १ ऑगस्ट रोजीं अबूकर आखातांत फ्रेंच आरमाराचा पाडाव केला. फ्रेंच आरमाराचा व नेपोलियनचा संबंध तुटल्यामुळे युरोपचा व नेपोलियनचा संबंध तुटल्यासारखेंच झालें ! अशारीतीनें नेल्सननें नेपोलियनचे दळणवळणाचे मार्ग बंद.. ठेवल्यावर नेपोलियनला कुमक मिळण्याचें बंद झालें. परंतु तशा स्थितीतही