पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें. ] फ्रान्सचे लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २२९ लीच त्यानें आपला मोर्चा लाँबर्डीकडे वळविला त्या प्रांतांतून ऑस्ट्रि- यन सैन्यास हांकून लावलें. नेपोलियनच्या या पराक्रमामुळे इटलीतील पोप व इतर राजेरजवाडे नेपोलियनची इटली- वरील मोहीम. बरेच हवालदील होऊन त्याच्याशी तह करण्यास कबूल झाले. इटलींतील संस्थानिक नेपोलियनचें वर्चस्व कबूल करीत असतां ऑस्ट्रियन सैन्यानें पुनः उचल घेऊन नेपोलियनचा पराभव करून आपला प्रांत परत मिळविण्याचें योजलें. परंतु नेपोलियनने एकदम चाल - करून अरकोला व रिव्होली या दोन ठिकाणीं ऑस्ट्रियन सैन्याचा पूर्ण पराभव करून, तो थेट व्हिएन्ना शहराच्या तटापाशीं येऊन दाखल झाला. कॅम्पो फोर्मियो चा तह-१७९७. नेपोलियनच्या या अचानक हल्ल्यामुळें बादशहा दुसरा फॅन्सीस तर चकितच झाला व आतां तह केल्याखेरीज गत्यंतर नाहीं हें ओळखून १७९७ च्या आक्टोबर महिन्यांत कँपो फोर्मियो येथें तहास कबूल झाला. या तहान्वयें ऑस्ट्रियानें आपल्या ताब्यां- तील बेलजमचा मुलूख फ्रान्सला दिला, इटलीमध्यें फ्रान्सचें वर्चस्व कबूल केलें, अयोनियन बेटें फ्रान्सच्या ताब्यांत ठेवण्याची संमति देऊन, फ्रान्सची उत्तरसीमा -हाईन नदीपर्यंत असण्यास मान्यता दिली; ऑस्ट्रियाला व्हेनीसचें लोकसत्ताक राज्य, इस्ट्रियामधील व्हेनीसचा प्रांत, डाल्मेशिया, अँडीजपर्यंत मुलूख मिळाला. इटलीमध्यें नेपोलियननें जिंकलेल्या लॉम्बर्डी व जेनोआ या संस्थानांचीं ‘सिसल्पिन' व 'लिगूरियन' अशीं दोन लोकसत्ताक राज्यें फ्रान्सच्या नमुन्याबरहुकूम स्थापण्यांत येऊन त्यावर फ्रान्सचें वर्चस्व प्रस्थापित करण्यांत आलें. वरील जय मिळवून नेपोलियन फ्रान्समध्ये परत आला तेव्हां त्याचा मोठा गौरव करण्यांत आला. नेपोलियनच्या पराक्रमानें फ्रान्स-