पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १५ वें. फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. इंग्लंड, ऑस्ट्रिया व सार्डीनिया या फ्रान्सच्या उरलेल्या शत्रूचा पाडाव करून फ्रान्सचें वर्चस्व अबाधित करावें असा नुकत्याच स्थापन झालेल्या डिरेक्टरीचा विचार होता. परंतु फ्रान्सजवळ आरमार नसल्या- मुळे इंग्लंडचा पराभव करणें अगदींच अशक्य होतें. परंतु ऑस्ट्रियाशीं युद्ध जाहीर केल्यास तशी कांहीं अडचण नाहीं हें पाहून जर्मनींत व इटलींत असलेल्या ऑस्ट्रियाच्या मुलखावर एकसमयावच्छेदेंकरून हल्ला करण्याचें डिरेक्टरीनें योजलें. जर्मनीकडील स्वारी मोठी महत्त्वाची अस- ल्यामुळ झूडन व मोरो या दोन प्रसिद्ध सेनापतींच्या हाताखालीं नांवाज- लेलें सैन्य देऊन या दोन सेनापतींस जर्मनीच्या मोहिमेवर पाठविण्यांत आलें. इटलीकडील स्वारी इतकी महत्त्वाची नसल्यामुळे नेपोलियनच्या हाताखालीं साधारण प्रतीचें तीस हजार सैन्य देऊन त्याची या मोहिमे- वर रवानगी करण्यांत आली. परंतु नेपोलियननें आपल्या हिंमतीवर इटली- मधील ऑस्ट्रियन सैन्याचा पराभव करून ' डिरेक्टरच्या अंदाजा - विरुद्ध इटलींतील पराक्रमामुळेंच या मोहिमेचा शेवट लावला. इटलीमध्यें नेपोलियनास ऑस्ट्रिया व पिडमाँट या दोन्ही सैन्यांचा . - तें सैन्य दुप्पट होतें तरी — पराभव करावयाचा होता. तेव्हां नेपोलियननें या दोन्ही सैन्यांस, तीं सैन्यें एकत्र होण्यापूर्वीच, निरनिराळ्या ठिकाणीं गांडून त्यांचा पूर्ण मोड केला. त्यानंतर नेपोलियननें ट्युरीनच्या किल्लया-- पर्यंत अकस्मात् चाल केली व सार्डिनियाच्या राजास तह करावयास लावून सेव्हाय व नीस हे दोन प्रांत मिळविले ( मे १७९६ ); नंतर लाग--