पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें . ] नेपोलियन बोना- पार्ट राष्ट्रीय मंडळाचें संरक्षण करतो. फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २२७ मध्यंतरी 'राष्ट्रीय मंडळ' फ्रान्ससाठीं एखादी सुव्यवस्थित राज्य- "घटना तयार करण्याच्या कामी गुंतलें होतें. या मंडळाकडून राज्यघट- नेचें काम होत असतां, प्रचलित राज्यव्यवस्था उलथून पाडण्यासाठीं १ एप्रिल, २० मे व ६ ऑक्टोबर रोजीं जाकोबिन क्लबनें चिथावल्यामुळें दंगेधोपे झाले; तरी मोठ्या शिकस्तीनें हे दंगे मोड- ण्यांत आले. ता. ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या दंग्याच्या वेळीं, हा दंगा मोडण्याचें काम नेपो- लियन बोनापार्ट नांवाच्या एका तरुण पुरुषा- कडे सोंपविण्यांत आलें होतें. तरुण नेपोलियननें यापूर्वी टूलोन येथें आपलें शौर्य दाखविलें होतें व आतां देखील हा दंगा तत्काल मोडून टाकण्याचे कामीं त्यानें आपल्या अंगची कर्तबगारी सर्वांच्या निदर्शनास आणली. अशा रीतीनें फ्रान्सच्या राजकारणांत या तरुण पुरुषाचा प्रवेश होऊन त्यास आपली कर्तबगारी सर्व जगाच्या निदर्शनास आणण्याची -संधि मिळाली ! मध्यंतरीं राष्ट्रीय मंडळानें नवीन सुव्यवस्थित राज्यघटना तयार केली व २६ ऑक्टोबर रोजीं आपलें विसर्जन करून घेतलें. या नवीन राज्य- घटनेप्रमाणें राष्ट्रांतील अंमलबजावणीचें खातें पांच सभासदांच्या एका मंडळाकडे-डिरेक्टरीकडे—सोंपविलें असून कायदे करण्यासाठीं एक राष्ट्रीय मंडळ स्थापन करण्यांत आलें. या मंडळाचे दोन भाग असून एकांत सामान्य लोकांचे पांचशें प्रतिनिधी व दुसऱ्यांत बड्या लोकांचे प्रतिनिधी असत.