पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. - कमिटीकडे मात्र आपण दुर्लक्ष करतां कामा नये. जुलमी राज्यव्यव- -स्थेकडून झालेली मह- त्त्वाची कामगिरी. | प्रकरण फ्रान्सविरुद्ध इतर युरोपियन राष्ट्रांनीं स्थापलेल्या संघापासून या कमि- टीनें फ्रान्सचें संरक्षण केलें होतें, इतकेंच नव्हे तर शत्रूच्या प्रदेशावर चाल करून बराच मुलूखही काबीज केला होता. या सर्व गोष्टी लक्षांत येण्या- साठीं आपणास त्या युद्धाकडे विहंगमदृष्टीने पाहिलें पाहिजे. १७९३ च्या सुमारास फ्रेंच सैन्यानें कसा तरी टिकाव धरला होता; परंतु १७९४ मध्ये सार्वजनिक सुरक्षिततेच्या कमिटीतील लष्करी तज्ज्ञ जो कार्नो यानें फ्रेंच सैन्याची जमवाजमव करून व त्यास योग्य प्रकारें कुमक पोहोंचवून शत्रूच्या प्रदेशांत लढाई नेऊन शत्रूची पिछेहाट केली. १७९४ च्या -मोहिमेंत झूडनच्या हाताखालीं फ्रेंच सैन्यानें फ्लूरस येथें शत्रूचा पराभव करून ( २६ जून) बेलजमच्या सर्व मुलखावर आपले वर्चस्व प्रस्थापित केलें. इकडे फ्रेंचांच्या दुसऱ्या तुकडीनें हॉलंड देश आपल्या वर्चस्वा- खाली आणला. प्रशिया व स्पेन यांच्याशीं तह- १७९५. फ्रान्सनें आस्ट्रियाच्या ताब्यांत असलेला बेल्जम प्रांत जिंकल्यावर - तेथे एक फ्रान्सच्या धर्तीवर लोकसत्ताक राज्य स्थापन करून त्यास 'बटे- व्हियन लोकसत्ताक' असें नांव दिलें. फ्रेंच सैन्यानें केलेल्या या विलक्षण पराक्रमामुळे फ्रान्सविरुद्ध स्थापन झालेला युरोपियन राष्ट्रांचा पहिला संघ नाहींसा होऊन शत्रुपक्षाकडील कांहीं राष्ट्र तह कर- ण्यास तयार झाली. फ्रान्समध्यें आतां जुलमी राज्यपद्धति नाहींशी होऊन सुरळीत राज्यपद्धति स्थापन झाली होती; व फ्रान्सला आतां युद्ध पुढें चालवावयाचें नसल्यामुळें १७९५ मध्यें प्रशिया व स्पेन या राष्ट्रांशीं बॅस्ले या ठिकाणी तह करण्यांत आला. त्यानंतर थोडक्याच दिवसांत टस्क- या संस्थानिकानेंही फान्सशीं तह केल्यामुळे फ्रान्सची स्थिति आतां पूर्वीप्रमाणे धोक्याची राहिली नाहीं; कारण आतां फान्सविरुद्ध ऑस्ट्रिया च इंग्लंड हींच काय तीं दोन राष्ट्रें टक्कर देण्यासाठीं तत्पर होतीं.