पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें । नेमस्त विचारांचा पगडा. फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २२५: लेल्या जुलमी राज्यव्यवस्थेचाही शेवट लागला व आतां सुरळीत राज्य- व्यवस्था प्रस्थापित करण्याची प्रत्येकास अवश्यकता वाटूं लागली. गेल्या वर्षीच्या जुलमी राज्यव्यवस्थेत ज्यांचा थोडा फार हात होता अशी बरीच मंडळी सध्याही राष्ट्रीय मंडळांत होती; तरी देखील त्यांनी आतां आपण व्यवस्थित व न्यायी राज्यव्यवस्थेचे प्रवर्तक आहोंत असें आपणावर पांघ - रूण घेऊन गेल्या वर्षी करण्यांत आलेल्या सर्व कृत्यांचे खापर ही मंडळी रोचेसपियर व त्याचे अनुयायी यांच्या माथ्यावर फोडूं लागली. फ्रान्सची राज्यव्यवस्था आतां नेमस्त पक्षाच्या राष्ट्रीय मंडळाच्या हातांत गेल्या- पासून सुरळीत व व्यवस्थित राज्यपद्धति सुरू होण्याची चिन्हें दिसूं लाग- ल्यामुळे त्यांना बऱ्याच लोकांचें पाठबळ मिळूं लागलें. हलके हलके पूर्वीच्या जुलमी राज्यव्यवस्थेच्या सर्व दुष्ट साधनांचा नायनाट करण्य उपक्रम सुरू झाला. पहिल्या प्रथम क्रांतिकारक व दंगेधोपे करणाऱ्या मंडळीस आश्रय देणारी पॅरिसची म्युनिसिपालिटी मोडून टाकण्यांत आली; त्यानंतर संशयास्पद माणसांची चौकशी करण्यासाठीं निर्माण करण्यांत आलेल्या कोर्टाचें उच्चाटन करण्यांत आलें. सार्वजनिक सुरक्षिततेच्या कमिटीचे बरेच अधिकार कमी झाले व आतां पुनः ज्वलज्जहाल क्रांतिकारक पक्षाचा पगडा बसूं नये म्हणून ठिकठिकाणचे जाकोबिन क्लब बंद करण्यांत आले. अशा रीतीनें पूर्वी - च्या राज्यपद्धतीचीं पाळेंमुळें खणून टाकल्यामुळें आतां पुनः फ्रान्समध्यें बेबंदशाई माजणार नाहीं असें सर्वांस वाटूं लागलें. गेल्या वर्षी फ्रान्समध्यें असलेल्या जुलमी राज्यपद्धतीस व त्या अमदानीत झालेल्या जुलमी व अनन्वित कृत्यांबद्दल त्या राज्यव्यवस्थेस दोष देत असतां त्या अमदानीत ' सार्वजनिक सुरक्षिततेसाठीं' नेमलेल्या