पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ रोवेसपिअरचें वर्चस्व. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण अनुयायी, राष्ट्रीय मंडळ, सार्वजनिक सुरक्षिततेची कमिटी, या सर्वांवर त्याची हुकमत चालत असून त्याचा प्रत्येक शब्द झेलण्यास ही सर्व मंडळी तत्पर असत. रोबेसपिअरनें जरी सर्वांवर आपली छाप बसविली होती तरी आपल्या हातांत सर्व सत्ता घेऊन राज्यकारभार व्यवस्थि रीतीनें हांकण्याची अक्कल मात्र त्याच्या अंगीं नव्हती. त्यानें आपल्या सर्व प्रतिस्पर्थ्यास एकामागून एक डोळ्यांआड केल्यावर, संशयास्पद लोकांच्या चौकशीसाठीं नेमण्यांत आलेल्या कोर्टात कांहीं बदल केला. हा फेरफार करण्यांत आल्यावर फांशी जाणाऱ्या लोकांची संख्या एकसारखी वाढू लागली. त्यानें या कोर्टाच्या घटनेंत नवीन फेरफार करण्यापूर्वी दीड महिन्यांत या कोटीकडून ५७७ लोकांस फांशी देण्यांत आलें होतें; परंतु नवीन फेरफार झाल्यावर या कोटीनें १३५६ माणसांस पुढील दीड. महिन्यांत फांशी दिलें, रोबेसपिअरच्या या जुलमी कृत्यानें, कोणत्या वेळी आपणास केवळ संशयावरून पकडण्यांत येऊन फांशी जावें लागेल याची कोणासच कल्पना नव्हती ! फ्रान्समधल हवालदील झालेली होती! रोबेसपिअरच्या सुलतानी अंमलाचा प्रत्येकासच तिटकारा आला होता ! या गोष्टीचा त्याच्या बऱ्याच शत्रूंनीं फायदा घेऊन रोबेसपिअरला जगांतून नाहींसें केल्यास आपल्यावरील व सर्व फ्रेंच जनते- वरील आपत्ति टळेल असें वाटून त्यांनीं रोबेसपिअरचा वध करण्याचा कट रचिला. शेवटीं रोबेसपिअरच्या शत्रूंच्या प्रयत्नास यश येऊन २७ जुलै १७९४ रोजी राष्ट्रीय मंडळानें त्यास फांशीची शिक्षा सांगितल्यावर लागलीच दुसऱ्या दिवशीं या खुनी माणसाचें - रोबेसपिअरचें - शिर गिलटीनवर लटकावण्यांत आलें !! नेमस्त क्रांतिकारक पक्षाची राज्यव्यवस्था. जनता ( २७ जुलै १७९४ ते २६ ऑक्टोबर १७९५. ) रोबेसपिअर व त्याचे साथीदार यांच्याबरोबर एक वर्षभर टिक-