पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वं. 1 फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २२३ त्त्वाच्या सुधारणा केल्या पाहिजेत असें त्यास वाटूं लागलें. सार्वजनिक सुरक्षिततेच्या कमिटीनें आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केलेला त्यास पहावेना ! देशांतील बहु- डॅन्टन व त्याच्या अनु- यायांचा पाडाव - एप्रील - १७९४. जनसमाज या जुलुमी राज्यपद्धतीनें अगदींच गांजून गेलेला पाहून त्यास फारच वाईट वाटे ! डॅन्टनच्या मनांतून प्रचलित राज्यपद्धतीत सुधारणा करण्याचें घाटत आहे. व त्यास सध्यां अस्तित्वांत असलेल्या ' सार्वजनिक सुरक्षितता' ठेवण्या- साठीं निर्माण झालेल्या कमिटीची कामगिरी आवडत नाहीं हें रोबेस- पियरच्या लक्षांत येतांच, डँटन व त्याचे अनुयायी यांना जितक्या लव- कर या जगांतून नाहींसें करतां येईल तितकें बरें असें वाटून रोबेसपियर व त्याचा साथीदार सेंट जस्ट हे त्या उद्योगास लागले. डॅन्टनसारखा प्रमुख मुत्सद्दी एक रांचा डोळ्यांआड झाला, म्हणजे आपल्या महत्त्वाकांक्षेस वाव मिळेल व आपणास आपल्या इच्छेप्रमाणें वाटेल त्या गोष्टी करतां येतील असें त्यास वाटत होतें. रोबेसपियरच्या प्रयत्नास थोडक्याच दिवसांत यश येऊन हेबर्टप्रमाणेंच डॅन्टनसारख्या प्रसिद्ध मुत्सद्यास व पुढाऱ्यास देखील अखेर गिलटीनला बळी पडावें लागलें. अशारीतीनें आपल्या मार्गात असलेला हा शेवटचा मोठा कांटा काढून टाकल्यावर रोबेसपिअरनें आपला महत्त्वाकांक्षेचा मार्ग सुकर करून ठेवला ! परंतु डॅन्टनसारख्या प्रसिद्ध मुत्सयास रोबेसपिअरनें फांशीं दिल्यावर, त्याच्या मनांत फ्रान्समधील सर्व सत्ता आपल्या हातांत घेऊन सर्वत्र सुलतानी गाजविण्याचा विचार आहे कीं काय असें लोक आपापसांत कुजबुजूं लागलें यांत कांहींच नवल नव्हतें ! आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यास एकामागून एक नाहींसें केल्यावर आतां आपल्या मार्गांत कसलीच आडकाठी उरली नाहीं हें रोबेसपिअरला कळून चुकलें. आतां त्याला सहजरीतीनें फ्रान्सची सर्व सत्ता आपल्या हातांत घेतां आली असती. पॅरिसची म्युनिसिपालिटी, जाकोबिन क्लबचे