पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. मेकांवर उठतील असें अनुमान करण्यास जागा होती. माऊंटेन पक्षांतील दुफळी. हेबेस्ट पक्षाचा पाडाव- मार्च १७९४. [ प्रकरण १७९३ च्या ऑगस्ट महिन्यांत जहाल क्रांतिकारक पक्षांत फूट पडल्याची चिन्हें स्पष्ट दिसूं लागलीं. या पक्षां- तून निघालेला जो ज्वलज्जहाल पक्ष होता, त्यानें बर्ट नांवाच्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखालीं जमून पॅरिस शहराची सर्व सत्ता आपल्या हातीं घेतली. रोमन कॅथलीक धर्माविरुद्ध या पक्षाचें मत असल्या- मुळे त्यांनीं एक निराळाच पंथ काढला व त्यास 'विचारप्रधान 'धर्म' असें नांव दिलें; व आपल्या नवीन पंथास कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊं नये म्हणून ज्यामध्यें जुन्या धर्माचें प्रति- पादन करण्यांत येत असे अशीं सर्व चर्चेस बंद ठेवण्याचे हुकूम सोडले. पूर्वीच्या रोमन कॅथलीक धर्माविरुद्ध या पक्षानें शस्त्र उचलल्यामुळे धर्माभिमानी व अडाणी लोकांकडून या नवीन पंथ स्थापणाऱ्या पक्षास विरोध करण्यांत येऊन या पक्षाविरुद्ध लोकमत व्यक्त होऊं लागलें. या संधीचा फायदा घेऊन रोत्रेसपियर यानें जुन्या धर्माच्या लोकांची कड घेतली व या पक्षास हाणून पाडण्याची खटपट चालविली. शेवटीं त्याच्या प्रयत्नास यश येऊन १७९४ च्या मार्च महिन्यांत रोबेसपियरच्या प्रयत्नानें सार्वजनिक सुरक्षितता ठेवण्यासाठी निर्माण झालेल्या कमिटीनें हेबर्टच्या सर्व अनुयायांस पकडून फांशी दिलें. हेबर्टच्या पाडावानंतर डॅन्टन नांवाच्या एका प्रसिद्ध व्यक्तीचा देखील नाश करण्याची रोबेसपियरची खटपट सुरू झाली. वास्त- विक पहातां डॅन्टन यानेंच माऊन्टेन हा पक्ष अस्तित्वांत आणून १७९२ मध्यें परचक्रापासून फ्रान्सचें संरक्षण केलें होतें. डॅन्टन हा एक मोठा मुत्सद्दी होता; व केवळ याच्याच प्रयत्नाने आणीबाणीच्या वेळीं फ्रान्सची धडगत लागली होती. फ्रान्सचें परचक्रापासून संरक्षण झाल्या- नंतर आतां फ्रान्सच्या अंतर्व्यवस्थेसंबंधीं लोकहिताच्या दृष्टीनें कांहीं मह-