पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वे. ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २२१ शिक्षा देत आहों असा आव आणण्याचा प्रयत्न करण्यांत येत असे. परंतु नंतर तसें कांहीं भासविण्याची या कोटीस आवश्यकता न वाटून बऱ्याच कैद्यांना एकदम न्यायासनासमोर ( ! ) उभे करून व त्यांचीं नुसती नांवें वाचून झाल्यावर चौकशी करण्याचा नुसता फार्सही न करतां फांशीची शिक्षा सांगण्यांत येई ! या न्यायकोर्टाकडून सर्वासच फांशींची शिक्षा सांगण्यांत येत असल्यामुळे एक नवी खाटिक शाळा स्थापण्याची अव- श्यकता वाटूं लागली! अशा प्रकारें प्रत्येक गोष्टीचा तांतडीने योग्य निकाल लावून सार्वजनिक सुरक्षितता ( ! ) स्थापन करण्याचें मोठें जबाबदारीचें काम हैं बारा लोकांचें मंडळ मोठ्या आस्थेनें करीत होतें ! ! या कमिटीत मॅरा नांवाचा गृहस्थ फारच खुनशी असून त्याच्याच सल्ल्यानें या कमिटीकडून वरील अनन्वित प्रकार चालत असत असें म्हण- ण्यास हरकत नाहीं. या दुष्ट माणसाचा वध केला तर फ्रान्समध्ये सध्यां सार्वजनिक सुरक्षितता या नांवाखालीं चाललेलीं अनन्वित कृत्यें थांबतील अशा समजुतीनें चार्लोटी कार्डे नांवाच्या नॉर्मंडीमध्ये राहणाऱ्या एका तरुण मुलीनें त्या दुष्ट माणसाच्या घरीं शिरून त्याचा वध केला. मॅराचा आपण वध केल्यास आपणास खुनी म्हणून फांशी देण्यांत येईल हें या मुलीस समजत नव्हतें असें नाहीं, परंतु असल्या भीतीस न जुमानतां तिनें मॅराचा वध करून आपले डोकें गिलटीनवर अडकावून दिलें ! सार्वजनिक सुरक्षितता स्थापण्यासाठीं निर्माण झालेल्या कमिटीनें आपल्या कारकीर्दीत इतर अनन्वित कृत्यांबरोबर १७९३ च्या आक्टोबर महिन्यांत राज्ञी मेरिआ अॅन्टोनी हिच्यावर वाटेल ते आरोप लावून तिला न्यायासनासमोर उभें केलें; व पूर्ण चौकशी करून तिला देखील फांशीची शिक्षा सांगण्यांत आली ! ! फ्रान्समध्यें सध्यां प्रचलित असलेली सुलतानी व जुलमी राजसत्ता फार दिवस टिकणें शक्य नव्हतें. जहाल क्रांतिकारक पक्षाच्या हातांत सर्व सत्ता होती तरी त्या पक्षामध्यें लवकर फूट होऊन दोन्ही तट एक-