पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लुई कॅपे - फ्रान्सचा माजी बादशहा १६ वा लुई- यास न्यायासनासमारे चौकशीसाठीं आणविण्यांत आलें व त्याच्यावरील आरोप शाबीत झाल्यामुळे त्यास फांशीची शिक्षा सांगण्यांत आली ! ता. २१ जानेवारी १७९३ मध्यें लुईचें शीर गिलटीनवर लटकूं लागलें ! फ्रान्सच्या विरुद्ध युरोपियन राष्ट्रांचा पहि ला संघ - १७९३. १६ व्या लुईस फांश देण्यांत आल्यावर युरोपमधील सर्व राष्ट्रांस फ्रेंच जनतेबद्दल तिटकारा वाटूं लागून फ्रान्समधील क्रांतिकारक मंडळीश झुंजण्यास युरोपियन राष्ट्रांचा पहिला मोठा संघ स्थापन झाला. या संघाश तोंड देण्यासाठीं फ्रान्सनें फेब्रुवारीमध्यें इंग्लंड व हॉलंड, व मार्च- मध्यें स्पेन यांच्याशीं लढाई पुकारली. मार्चच्या २३ तारखेस ' पवित्र रोमन पातशाहींत ' मोड- णाऱ्या सर्व राष्ट्रांनीं फ्रान्सशीं युद्ध जाहीर केलें. अशा रीतीनें एप्रिल महिन्याच्या सुमारास हा युद्धाचा वणवा पूर्वीप्रमाणें केवळ ऑस्ट्रिया व प्रशिया या दोन देशांपुर- ताच मर्यादित न रहातां सर्व युरोप खंडभर भडकला, व या वणव्यापासून आपल्या राष्ट्राचें संरक्षण करण्याची भयंकर जोखीम फ्रान्सवर येऊन पडली. २१ मार्चमध्यें फ्रेंच सैन्याचा नीरविनडेन या ठिकाणीं पराभव होऊन फ्रेंच सैन्यास माघार घ्यावी लागली. या पराभवामुळें फ्रान्सवर चोहोंकडून चालून येणाऱ्या शत्रूशीं टक्कर देण्यासाठी फ्रान्सनें अटोकाट प्रयत्न करणें अत्यावश्यक आहे, व असा प्रयत्न केल्याखेरीज फ्रान्सची कांहीं धडगत नाहीं हें मात्र निदर्शनास आलें. फ्रान्सवर सर्व बाजूंनी येत असलेल्या परचक्राशीं तोंड देऊन राष्ट्रांत स्वस्थता राखण्यासाठीं नऊ सभासदांचें एक मंडळ स्थापन करण्यांत आलें. परंतु हें मंडळ स्थापते वेळीं व या मंडळाच्या हातीं कोणते अधिकार असावेत, हैं ठरविते वेळीं जिराँडीस्ट व माऊंटेन या दोन पक्षांमधील मतभेद विकोपास जाऊन हातघाईचा 'जिराँडीस्ट' पक्षाचा प्रसंग आला. दोन्ही पक्षांस आपल्या राष्ट्राचे हित व्हावें, असें मनापासून वाटत होतें; परंतु तें हित पांडव. साध्य होण्यास कोणते उपाय योजावयाचे याबद्दल मात्र दोन्ही पक्षांमध्यें