पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें . ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति २१७ होती. त्या मंडळामध्ये एकंदर ८०० सभासद असून त्यांतील प्रत्येकजण कट्टा लोकसत्तावादी होता. परंतु त्यांच्यामध्ये देखील थोड्याफार मत- वैचित्र्यानें निरनिराळे पक्ष उत्पन्न होऊन दोन पक्ष प्रामुख्यानें पुढें आलेले होते. ते दोन पक्ष म्हणजे 'जिराँडीस्ट' व 'माऊंटेन' राष्ट्रीय मंडळांतील दोन पक्ष - जिराँ- डीस्ट व माऊन्टेन. हे होत. याखेरीज दुसरा एक 'प्लेन' नांवाचा लहानसा पक्ष असून तो कधीं पहिल्या तर कधीं दुसऱ्या पक्षास जाऊन मिळे. गेल्या सप्टेंबर महि- न्यांत स्वतंत्रतेच्या व लोकसत्ताक राज्यपद्धतीच्या नांवाखालीं जीं अन- न्वित कृत्यें करण्यांत आलीं, तशाप्रकारचीं कृत्यें पुनः होऊं नयेत म्हणून व्यवस्थित कायदे करून राज्यकारभाराची घडी नीट बसविल्यास फ्रान्सचें आपणास हित साधतां येईल असें 'जिरॉडीस्ट' पक्षास वाटत होतें. यांच्या- 'पेक्षां 'माऊंटेन' पक्षाचीं मतें थोडीं भिन्न असत. फ्रान्सचें शत्रूपासून संरक्षण करणें हें आपलें पाहिलें कर्तव्य असल्यामुळे त्याकामी लोकांच्या स्वतंत्रतेवर घाला घालण्याची पाळी आली तरी बेहेत्तर असें या पक्षास चाटत असे ! राष्ट्रापुढें व्यक्तीच्या स्वातंत्र्याची मुळींच किंमत नाहीं असें हा पक्ष प्रतिपादन करी ! माऊंटेन व जिराँडीस्ट या दोन पक्षांमधील तीव्र मतभेद १६ व्या लुईच्या चौकशीच्या वेळीं निदर्शनास आला. शहास व त्याच्या कुटुंबास कैदी म्हणून होतें. १७९२ च्या डिसेंबर महिन्यांत पदच्युत देण्यांत येतें - २१ १० ऑगस्टपासून बाद - अटकेंत ठेवण्यांत आलें बादशहास चौकशीसाठी न्यायासनासमोर उभे करण्यांत आलें. १६ व्या १६ व्या लुईस फांशीं लुईच्या वतीनें रदबदली करून त्यास होणारी जानेवारी १७९३. शिक्षा माफ करण्यासाठी 'जिराँडीस्ट' पक्षानें. 'खटपट केली; परंतु लोकांच्या तंत्राने चालणाऱ्या 'माऊंटेन' पक्षास राजाची चौकशी होऊन त्यास शिक्षा होणें अत्यावश्यक वाटत होतें; व राष्ट्रीय मंडळांत या पक्षाचे अनुयायी बरेच असल्यामुळे १४