पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें . ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २१९ मतभेद होता. जिराँडीस्ट पक्षाने मोठमोठालीं भाषणें केलीं व अंतःस्थ स्थिति सुधारून व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर राष्ट्राकडून घाला न घालण्याचा प्रयत्न केला तरच बिघडलेली घडी नीट बसण्याचा संभव आहे, असें प्रतिपादन केलें. परंतु माऊंटेन पक्ष म्हणूं लागला कीं, सध्यां बिकट परि- स्थिति उत्पन्न झालेली आहे, राष्ट्रावर चोहोंकडून परचक्र येत आहे, तेव्हां या वेळीं मोठमोठाली भाषणे करून व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यांत कांहींच हंशील नाहीं, तर सार्वजनिक सुरक्षितता स्थापण्यासाठीं व परचक्राशीं तोंड देण्यासाठी नेमण्यांत आलेल्या मंडळास या वेळीं सर्वच अधिकार देणें इष्ट आहे ! माऊंटेन पक्षाचें असें म्हणणें असून आपल्या विरुद्ध पक्षाचा पाडाव करण्यासाठीं या पक्षाकडून एक सशस्त्र टोळी सज्ज ठेवण्यांत आली, व आपल्या हेतूच्या आड येणारास वाटेल तें करून जगांतून नाहींसें करून टाकण्याचा या टोळीस हुकूम देण्यांत आला. अशारीतीनें माऊंटेन पक्षाची संमति मिळाल्यावर या टोळीनें राष्ट्रीय मंड- ळाच्या बैठकीच्या वेळीं सभागृहावर हल्ला केला व ता. २ जून १७९३ रोजी जिराँडीस्ट पक्षाचे पुढारी पकडून नेऊन त्यांपैकी ३१ जणांना अटकेंत ठेवलें ! माऊंटेन पक्ष प्रबळ राष्ट्रीय मंडळांत माऊंटेन या ज्वलज्जहाल क्रान्तिकारक पक्षावर, जिराँडीस्ट या नेमस्त पक्षाचा असलेला थोडाबहुत दाब वरील कृतीनें नाहींसा झाल्यामुळे त्यांच्या या पुढील अनन्वित कृत्यास तर सीमाच राहिली नाहीं ! वाटेल तें करून फ्रान्सचें शत्रूपासून संरक्षण करणें एवढाच एक हेतु या पक्षापुढें होता; व तो साध्य करण्यासाठीं त्यांनीं जीं हिडिस व अंगावर शहारे आणणारी कृत्यें केलीं, तीं पाहिलीं म्हणजे १७९२ च्या सप्टेंबर महिन्यांत फक्त तीनच दिवसांत जे २००० खून पडले त्या प्रसं- गाची आठवण होते. पण त्यावेळीं तें हिडीस काम फार तर ४-५ दिव- सच टिकलें, परंतु या माऊंटेन पक्षाचें वर्चस्व एक वर्षभर टिकलें असल्यानें.. होतो.