पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण करण्यांत येत! या मंडळींनी सप्टेंबर २, ३, ४ तारखेस केलेल्या अन- न्वित कृत्यांची वर्णनें ऐकलीं म्हणजे अंगावर शहारे येतात ! या तीन दिवसांत दोन हजार निरपराधी माणसांचे खून करण्यांत आले ! थोड- क्यांत सांगावयाचें म्हणजे फ्रान्समधील सर्व सत्ता खून करण्यास उद्युक्तः झालेल्या सशस्त्र टोळीच्या हातीं गेली होती ! अंगावर शहारे आण- णाऱ्या या भयंकर कृत्याचा प्रतिकार करण्याचा कोणाकडूनही प्रयत्न झाला नाहीं ! पॅरिसमधील सर्व लोक हें हिडीस कृत्य मुकाट्यानें: पहात होते ! ! राष्ट्रीय मंडळ. ( २१ सप्टेंबर १७९२ ते २६ आक्टोबर १७९५. ) फ्रेंच राष्ट्र लोकसत्ताक बनतें. ता. २१ सप्टेंबर रोजी नवीन 'राष्ट्रीय मंडळ ' नेमण्यांत आल्या- वर खुनी लोकांचें औट घटकेचें राज्य संपुष्टांत आलें. नवीन भरलेल्या राष्ट्रीय मंडळाने पहिल्याच बैठकींत फ्रान्सचें राष्ट्र लोकसत्ताक असल्याचें जाहीर केलें. प्रशियन लोकांचा व्हाल्मी येथें याच सुमारास पराभव झाला होता व आणखी कांहीं दिवसांनी आस्ट्रियाचा लिली येथें पराभव झाल्या- मुळे परकीय शत्रूपासून फ्रान्सची त्या वेळेपुरती तरी सुटका झाली. त्या- नंतर फ्रेंच सैन्यानें सॅक्सनी प्रांतावर हल्ला करून व्हाईन नदीच्या आस- मंतांतील प्रांत आपल्या ताब्यांत घेतला; व नोव्हेंबरमध्यें आस्ट्रियाच्या ताब्यांत असलेला नेदर्लंडमधील मुलूख मिळविला. अशा रीतीनें परकीयः शत्रूवर जय मिळाल्यावर आपल्या अंतस्थ स्थितीसंबंधानें विचार करण्या- साठी या 'राष्ट्रीय मंडळास सवड मिळाली. फ्रान्समधील सर्व सत्ता आतां या नवीन भरलेल्या 'राष्ट्रीय. मंडळा'च्या हाती असून फ्रान्सची भवितव्यता यांच्याच हातीं.