पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें. ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २१५ श्यक असणान्या वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तु तयार करणारे सर्व कारखाने बंद करण्यांत येऊन शस्त्रास्त्रे व युद्धसामग्री यांची पैदास जोरानें कर- ण्यांत आली. सैन्यांत दाखल न होणाऱ्या सर्व धडधाकट लोकांस सक्तीनें सैन्यांत खेचून आणण्यांत आलें. अशा प्रकारें हरप्रयत्न करून या 'माऊंटेन' पक्षानें फ्रान्सच्या आणीबाणीच्या प्रसंगीं शत्रूशीं तोंड देण्या- -साठी मोठी फौज जमा केली. जिवावर उदार होऊन लढण्यासाठीं सर्व फ्रेंच राष्ट्र तयार झाल्या- मुळें फ्रेंच सैन्यानें व्हाल्मी येथें प्रशियाचा पराभव करून ( १७९२ सप्टें- बर) प्रशियन सैन्याच्या पॅरिसकडे जाणाऱ्या ओघास अडथळा घातला व -या वेळीं प्रशियाचा राजा फेडरीक वुइल्यम याला पोलंडचा आणखी एक लचका तोडण्याची सुसंधि मिळाल्यामुळे त्यानें फान्सशीं युद्ध तसेंच टाकून आपल्या सैन्यास परत फिरण्याचा हुकूम दिला. फ्रान्समधील जहाल लोकसत्तावादी क्रांतिकारक पुढाऱ्यांच्या प्रेर- णेनें शत्रूचा पराभव झाल्यावर या मंडळींचा डोळा साहजिकच फ्रान्सच्या अंतस्थ स्थितीकडे वळला. या वेळी त्यांच्याकडून जीं अनन्वित कृत्यें करण्यांत आलीं तीं नीट समजण्यास आपणास फ्रान्सच्या त्या वेळच्या स्थितीकडे लक्ष दिलें पाहिजे. त्या वेळीं फ्रान्समध्यें सर्वत्र बेबंदशाही माजलेली असून सर्व सत्ता थोड्या माणसांच्याच हातांत होती. फ्रान्स- मधील सैन्यभरतीच्या वेळीं राजसत्तावादी मंडळीकडून त्यांना अडथळा येत असून राजसत्तावादी पक्षाच्या अनुयायांची संख्या बरीच असल्यानें, दुसऱ्या कोणत्या उपायांनीं नाहीं तरी अनन्वित कृत्ये करून या मंडळी घाबरविण्याचा डॅन्टन, मॅरा, यांचे अनुयायी प्रयत्न करूं लागले. ज्या ज्या माणसांचा राजसत्तावादी पक्षाकडे कल आहे अशी या मंडळीस शंका येई, त्या सर्व मंडळीस कैदेत टाकण्याचा या मंड- पॅरिसमध्ये झालेली ळींनीं सपाटा चालविला ! थोडक्याच वेळांत तुरुंगांत येणाऱ्या मंडळींची संख्या एकसारखी वाढूं लागून तुरुंग कैद्यांनी चिकार भरून जाऊं लागले; कत्तल - सप्टेंबर १७९२. २, ३, ४ तेव्हां तुरुंगांत असलेल्या कैद्यांची सरसहा कत्तल करून तुरुंग पुनः रिकामे