पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-२१४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण फ्रेंच जनतेच्या वरील अत्याचारास 'राष्ट्रीय मंडळाकडून संमति मिळाली ! या ' राष्ट्रीय मंडळा ' नें लागलीच राजाला पदच्युत करण्याचा च हल्लींची राज्यघटना बदलून लोकसत्ताक राज्यपद्धतीची नवीन राज्य- घंटना तयार करण्यासाठीं एक नवीन मंडळ निवडण्याचा ठराव पास करून घेतला. ता. २१ सप्टेंबरपासून हैं नवीन मंडळ भरणार होतें. अशा रीतीनें दहा महिन्यांतच केवळ राजसत्ताच नव्हे, तर पूर्वीच्या राष्ट्रीय मंडळा'ने ठरविलेली घटना देखील संपुष्टांत आली ! लोकाराधन करणा- -या मंडळींचा उदय. राजसत्ता नाहींशी झाल्यावर फ्रान्सची राज्यव्यवस्था ' राष्ट्रीय मंडळ ' व त्या मंडळानें नेमलेलें प्रधानमंडळ यांच्या हातांत जावयास पाहिजे होती ! परंतु पॅरीस शहर या वेळीं खवळ- लेल्या फ्रेंच जनतेच्या हातीं गेल्यामुळे आपल्या हातांत राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे ठेवून सर्वत्र शांतता राखणें राष्ट्रीय मंडळास व प्रधानमंडळास कठीण वाटूं लागलें. या वेळीं बहुजनसमाजाची आराधना करून, त्यांच्या क्रान्तिकारक विचारांस प्रोत्साहन देणारी ‘रोबेसपिअर, डॅन्टन, मॅरा' वगैरे मंडळी पुढें येऊं • लागली. या पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखालीं राष्ट्रीय मंडळांत ' माऊंटेन' या - टोपण नांवाखालीं एक जहाल क्रांतिकारक पक्ष अस्तित्वांत आला असून १० ऑगस्टपासून, म्हणजे ज्या वेळीं फ्रान्समधील राजसत्ता नाहींशी कर- ·ण्यांत आली, त्या दिवसापासून २१ सप्टेंबरपर्यंत, फ्रान्समधील राज्य- · व्यवस्थेचीं सर्व सूत्रे या जहाल क्रांतिकारक पक्षाच्या पुढाऱ्यांच्याच हातीं . होतीं असें म्हटलें पाहिजे. फ्रान्सवर हल्ला करणाऱ्या प्रशियन सैन्यास मागें हटविणें हेंच काम -मुख्यत्वेंकरून फ्रेंच लोकांपुढें होतें; व या कामीं नवीन उद्भूत झालेल्या माऊंटेन पक्षानें पुढाकार घेतला. राष्ट्रावर संकट माऊंटेन पक्षाकडून आलें असल्यामुळे इतर सर्व धंदे सोडून सर्व धड- फ्रान्सचें संरक्षण. धाकट पुरुषांनीं शत्रूपासून आपल्या देशाचा बचाव करण्यासाठी पुढे यावें असें जाहीर करण्यांत आलें. जीवनक्रमास अव-