पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें . ] फ्रान्समधील राज्यकान्ति. २१३ पक्षास वाटत होतें, तें खोटें ठरून आस्ट्रियाशीं झालेल्या पहिल्याच चकमकींत कवाईत शिकवून तयार नसलेल्या, व केवळ आयत्या वेळीं तयार ठेवलेल्या फ्रेंच सैन्याचा पराभव झाला. येत्या मे महिन्यांत फ्रान्सवर. स्वारी करण्याचा आस्ट्रिया व प्रशिया या राष्ट्रांचा. विचार आहे असें ऐकतांच फ्रान्सवर येऊ पहा- णाऱ्या या आपत्तीमुळे सर्वजण हवालदील झाले... फ्रान्सचे पहिले अपजय. फ्रान्सच्या अपजयाबद्दल भलत्याच बातम्या पसरूं लागल्या! फ्रान्समधील कांहीं मंडळी शत्रूस फितूर आहेत अशाच प्रकारच्या त्या अफवा असत !! फ्रेंच सैन्याच्या पराभवाचें सर्व खापर राजाच्या माथ्यावर फोडण्यांत येऊन राजाच्या हेतूविषयीं वाटेल त्या कंड्या लोकांत पसरू लागल्या.. इकडे प्रत्येक दिवशी प्रशियन सैन्य पॅरीस शहरानजीक येत असल्या- च्या बातम्या ऐकून फ्रान्समधील लोकांचें पित्त खवळलें ! अशा वेळीं ‘१६ व्या लुईच्या केसास फ्रेंच लोकांनीं धक्का लावला तर आपण पॅरीस शहराची जाळून राखरांगोळी करूं ' अशी प्रशियन सेनापति बन्सविक् यानें धमकी दिल्यामुळे तर लोकांस राजाबद्दल वाटत असलेल्या त्वेषास. सीमाच राहिली नाहीं ! राजा शत्रूस फितुर आहे म्हणूनच त्याच्याबद्दल प्रशियन सेनापतीस सहानुभूति वाटून त्यानें वरील प्रकारचे धमकीचे उद्गार काढले अशी लोकांची समजूत झाल्यामुळे प्रजासत्तावादी पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखालीं, १६ व्या लुईस आपल्या सिंहासनावरून पदच्युत करण्या-- साठीं फ्रेंच लोक राजवाड्यावर हल्ला करण्यासाठी निघाले. सकाळी ८ वाजतां राजाच्या खास हुकमतीखालीं असलेल्या स्विस पडू १६व्या लुईस लोकांची ही बंडाळी मोडतां आली असती, परंतु त्यानें घाब- रून जाऊन असा विचार मनांत आणला नाहीं. जेव्हां आपला राजवाडा बंडखोर लोकांच्या ताब्यांत जात अस- ल्याचें राजानें पाहिलें, तेव्हां त्यानें घाबरून जाऊन 'राष्ट्रीय मंडळा'चा आश्रय घेतला. या वेळीं स्विस फौजेनें आपली पराकाष्ठा करून लोकांच्या विरुद्ध राजवाड्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला..