पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ आस्ट्रियाशी युद्ध - एप्रिल १७९२. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण बाटूं लागलें. या व अशाप्रकारच्या हेतूनें प्रेरित झाल्यामुळें आस्ट्रियाशीं युद्ध सुरू करणें क्रान्तिकारक व प्रजासत्तावादी सभासदांस अत्यावश्यक गोष्ट वाटूं लागली. जरी या गोष्टीस रोबेसपिअर व दुसरे कांहीं जाकोबीन पुढारी विरुद्ध होते तरी जहाल लोकसत्तावादी पुढाऱ्यांचा ' राष्ट्रीय मंडळावर ' पगडा बसून आस्ट्रियाशीं युद्ध करण्याचें एप्रिलच्या २० तारखेस फ्रान्सनें जाहीर केलें. आस्ट्रियाशीं युद्ध पुकारून एक महिना झाला नाहीं तोंच आस्ट्रि- याचा कर्तृत्ववान् बादशहा लिओपोल्ड मरण पावून, त्याचा मुलगा २ रा फॅन्सीस गादीवर आला ( १७९२-१८३५ ). २ रा फॅन्सीस आपल्या पित्याप्रमाणें कर्तृत्ववान् नसून फ्रान्सच्या राजक्रान्तीशीं टक्कर देण्याची भयंकर जोखीम त्याच्या अंगावर येऊन पडली. फ्रान्सशीं उपस्थित झालेल्या युद्धांत जर फ्रेंच प्रजासत्तावादी लोकांचा जय झाला तर युरोपमधील सर्वच देशांतील राजसत्तेस धोका येईल या भावनेनें या युद्धांत आस्ट्रियाच्या बाजूनें फ्रान्सशीं लढण्यास प्रशियाही तयार झाला. अशा- रीतीनें १७९२ साली फ्रान्सच्या राज्यक्रान्तीशी झुंजण्यास आस्ट्रिया व प्रशिया हीं दोन प्रमुख युरोपियन राष्ट्रें तत्पर झालीं. आस्ट्रियाशीं लढाई पुकारण्यांत ज्यांनीं प्रमुख भाग घेतला होता, त्या जिराँडीस्ट पक्षानें आपली भलतीच समजूत करून घेतली होती. आस्ट्रियाशीं युद्ध पुकारतांच फ्रान्समधील राज्यक्रान्तीचें अनुकरण करून युरोपमधील इतर सर्व राष्ट्रांतील लोक, आपआपल्या जुलमी राजांस सिंहासनांवरून पदच्युत करतील अशी या लोकांची कल्पना चुकीची ठरली ! आपण सर्व मानवजातीस जुलमी राजांच्या सुलतानी अमला- पासून सोडवून स्वातंत्र्यसुखाचा आस्वाद घ्यावयास प्रवृत्त करीत आहोंत अशी यांनीं आपली भलतीच समजूत करून घेतली होती ! आस्ट्रियाशी होणाऱ्या युद्धांत आपणास तत्काळ जय मिळेल असें या