पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वे. ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २११ सभासदांमध्यें ‘जॅकोबीन' कुत्रांमध्यें ज्यांनीं वक्तृत्वाचें प्रदर्शन केलें होतें,. परंतु ज्यांना वास्तविक पहातां राज्यकारभाराची कांहींच माहिती नव्हती अशा लोकांचाच भरणा अधिक होता ! नवीन राष्ट्रीय मंडळ जमल्यावर थोडक्याच दिवसांत त्यांत निर- निराळे पक्ष अस्तित्वांत येऊ लागले गेल्या राष्ट्रीय मंडळानें तयार केलेली घटना कायम ठेवावी असें म्हणणारा एक लहान पक्ष असून त्याचे अनु- यायी फारच थोडे होते. याखेरीज इतर सभासदांमध्ये 'माऊंटेन' व 'जिराँ- डीस्ट' असे दोन पक्ष अस्तित्वांत आले; परंतु फ्रान्समध्यें राजसत्ता नाहींशी करून प्रजासत्ताक राज्यपद्धति स्थापन करावी या बाबतींत या दोन्ही पक्षांचें एकमत असल्यामुळे तशा प्रकारच्या सूचना राष्ट्रीय. मंडळाच्या बैठकींत जोरानें पुढें येऊं लागल्या. पहिल्या प्रथम या पक्षांतील सभासदांनीं, लुईची इच्छा नव्हती तरी त्यास आस्ट्रियाच्या विरुद्ध युद्ध जाहीर करण्यास भाग पाडलें. राष्ट्रीय मंडळांतील निरनिराळे पक्ष. आस्ट्रिया युद्ध पुकारण्यांत लोकपक्षीय पुढाऱ्यांच्या मनांत दोन तीन हेतु साध्य करून घेण्याचें होतें. 'पवित्र रोमन पादशाही'चा बादशहा लिओपोल्ड, १६ व्या लुईच्या पत्नीचा भाऊ असून त्यानें फ्रान्समधील राज्यक्रान्ति दपटून टाकण्याचें आपलें धोरण प्रशियाच्या संमतीनें पिलनिट्झच्या जाहीरनाम्यानें ( १७९१ आक्टोबर ) जाहीर केल्यामुळे फ्रान्समधील क्रान्तिकारक पक्षास, आस्ट्रियाचा अर्थातच राग आला होता; व त्याखेरीज फ्रान्समधील राज्यक्रान्तीच्या सुरुवातीबरोबर फ्रान्समधील बरेच अमीरउमराव, फ्रान्स व आस्ट्रिया यांच्या सरहद्दीवर असलेल्या व्हाईन नदी- च्या पलीकडे गेले होते व १६ व्या लुईचा भाऊ अस याच्या हाताखालीं त्यांनीं बरेंच सैन्य जमविलें असून 'क्रान्तिकारक फ्रेंच जनतेवर आपण चांगलाच सूड उगवूं ' असें त्यांनी जाहीर केल्यामुळे त्यांचाही समाचार आपणास घेतां येईल असें 'राष्ट्रीय मंडळां'तील प्रजासत्तावादी सभासदांस