पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० युरोपचा अर्वाचीन इतिहास [ प्रकरण आला. यावेळीं फ्रान्सदेश सोडून जाण्याचा आपला मुळींच विचार नव्हता असें लुईनें जाहीर केल्यामुळे राष्ट्रीयमंडळानें त्यास गादीवर बसविलें, व लुईनें नवीन राज्यघटनेप्रमाणें राजकारभार चालविण्याची गंभीरपणे शपथ घेतली. ता. ३० सप्टेंबरच्या सुमारास राज्यघटनेत कांहीं किर-- कोळ सुधारणा करून १७८९ मध्ये लुईनें बोलाविलेल्या 'राष्ट्रीय मंड- टानें आपखुषीनें आपलें विसर्जन केलें. गेल्या दोन वर्षांत या मंड- ळानें जरी पुष्कळ चुका केल्या होत्या, तरी त्यांनी फ्रान्सची नवी राज्यघटना उत्तम रीतीनें सुचविली होती. परंतु या नवीन घटनेप्रमाणें फ्रान्सचा राज्यकारभार सुरळीत चालतो कीं नाहीं हेंच आतां पहावयाचें होतें ! ! कायदे करणारे मंडळ. ( १ आक्टोबर १७९१ ते २१ सप्टेंबर १७९२. ) गेल्या 'राष्ट्रीय मंडळा' नें ठरविलेल्या घटनेप्रमाणें कायदे करण्या- साठीं नवीन 'राष्ट्रीय मंडळा'ची निवडणूक होऊन तिची पहिली बैठक : बोलाविण्यांत आली. परंतु जुन्या 'राष्ट्रीय मंडळांतील सभासदांची स्वार्थत्यागाची कल्पना या वेळीं पार चुकली असून ती उलट राष्ट्रविधा- तकच ठरली; कारण या नवीन घटनेप्रमाणे निवडण्यांत येणाऱ्या 'राष्ट्रीय मंडळांतील सभासदाच्या जागेसाठी उमेदवार म्हणून उभें राहण्याचें, जुन्या, कसलेल्या व अनुभविक सभासदांनी आपला स्वार्थत्याग व्यक्त करण्या- साठीं नाकारलें ! तेव्हां या नवीन 'राष्ट्रीय मंडळां'त निवडून आलेले. ७४५ सभासद कायदे करण्याच्या कामास अगदींच अननुभविक होते. त्यांना राज्यकारभार सुरळीत रीतीने चालविण्यास कोणत्या गोष्टींची अवश्य- कता असते, याची कांहींच माहिती नव्हती. तेव्हां . नवीन 'राष्ट्रीय या मंडळापासून राष्ट्राचं हित होण्याऐवजी, उलट मंडळा'चं अननुभविकत्व. त्यांच्या चमत्कारिक सूचनांप्रमाणे वागल्यास राष्ट्रा-- वर धोका येण्याचाच अधिक संभव होता ! नवीन निवडून आलेल्या