पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें . ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २०९ राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभार चालविणें अगदीच अशक्य आहेसें त्यास वाटू लागलें; व मिरॅबोच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय मंडळांत आपली बाजू घेणारा कोणीच नाहीं हें कळून आल्यामुळे फ्रान्समधून पळून जातां आलें तर बरें असें १६ व्या लुईला वाटूं लागलें. ता. २० जून पर्यंत राजा आपल्या सर्व कुटुंबासह पळून जाणार आहे हें कोणालाही समजलें नव्हतें. राजाचा पळून जा- ण्याचा प्रयत्न. २० जून १७९१. त्या रात्रीं फ्रान्समधून पळ काढीत असतां घोडया- च्या टप्याच्या ठिकाणीं घोडे बदलतांना बराच वेळ राजाची खोटी झाली नसती तर त्यास गुप्तपणें फ्रान्समधून पळ काढतां आला असता, परंतु ' सेंट मेनेहोल्ड' या ठिकाणीं घोडे बदलतांना जास्ती खोटी झाल्यामुळे, तेथील लोकांनी राजास ओळखलें, व तेथें त्यास पकडून पुन: पॅरीसला पाठवून देण्यांत आलें ! राजाची पुन: पॅरिसला रवानगी करण्यांत आल्यावर 'राष्ट्रीय मंडळां' तील राजसत्तावादी व लोकसत्तावादी सभासदांमध्ये तीव्र वाद- 'विवाद होऊं लागला. राजसत्ता असल्याखेरीज कोणतीच राज्यघटना टिकणें शक्य नाहीं, व राजाच्या हातीं राष्ट्रीय मंडळानें दिलेले अधिकार अगदीच तुटपुंजे असून त्यायोगानें राज्यकारभार चालविणें अगदींच अशक्य वाटल्यामुळे राजानें फ्रान्समधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, असें राजसत्तावादी सभासद म्हणूं लागले. तर उलट लोकसत्तावादी पुढा- ज्यांना राजाच्या पळून जाण्याच्या प्रयत्नामुळें राजसत्तावादी व . लोकसत्तावादी सभा- सदांमध्ये मतभेद. राजास पदच्युत करून फ्रान्समध्यें लोकसत्ताक राज्य स्थापन करण्यासासाठीं जोराची चळवळ करण्यास संधि मात्र मिळाली! शेवटीं राजसत्तावादी व लोकसत्तावादी सभासदांमधील तंटा विकोपास जाऊन हातघाईचा प्रसंग आला (१७ जुलै); परंतु सरतेसेवटीं राष्ट्रीय मंडळांत राजसत्तावादी सभासदांचे मताधिक्य असल्यामुळे राष्ट्रसंरक्षक सैन्याच्या मदतीनें हा दंगा मोडण्यांत