पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण एकतंत्री व अनियंत्रित राज्यपद्धतीनें ज्यांचें थोडें फार नुकसान झालें होतें अशाच मंडळींचा या नवीन राष्ट्रीयमंडळांत भरणा असल्यामुळे एकतंत्री राज्यपद्धति का फ्रान्समधील नवीन राज्यघटनेची रूपरेषा. कू त्या जागीं लोकांच्या पूर्ण संमतीनें चाललेली एखादी राज्यघटना या मंडळींनी ठरविली असल्यास त्यांत विशेष आश्चर्य वाटण्यासारखें कांहींच नाहीं. थोडक्यांत या नवीन घटनेप्रमाणें राष्ट्रासंबंधीं कायदे करणाऱ्या मंडळास कार्यकारी मंडळावर हुकमत चालविण्याचे अधिकार देण्यांत आले होते. कायदे करणारी सभा एकच असून ती दोन वर्षांनीं बदलावयाची होती. या नवीन राज्यघटनेची रूपरेषा जेव्हां ठरविण्यांत आली त्या वेळीं राष्ट्रीय मंडळांतील एक प्रसिद्ध मुत्सद्दी मिरॅबो याचें असें म्हणणें होतें कीं, नवीन राज्यघटने- प्रमाणे अंमलबजावणीच्या खात्यास व त्या खात्यावर लेल्या राजाच्या हातीं फारच थोडे अधिकार देण्यांत आल्यामुळे अंमलबजावणीचें खातें अगदींच कुमकुवत राहील; म्हणून या खात्यास अधिक अधिकार देणें अत्यावश्यक आहे. परंतु राष्ट्रीय मंडळांतील इतर सभासदांकडून मिरॅबोच्या सूचनेस जोराचा विरोध करण्यांत आला व त्याची सूचना नापास झाली. आपली सूचना फेटाळून लावण्यांत आली व आपलें कोणीच ऐकत नाहीं हें पाहून तो फारच कष्टी झाला व सरते शेवटीं १७९१ मध्यें तो मरण पावला. मरतेसमयीं फ्रान्सच्या उत्तरराज्यक्रान्तीसंबंधानें त्यानें केलेलें भाकीत पुष्कळ अंशांनीं खरें ठरलें ! मुख्य अस- मिरॅबोच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय मंडळांत राजसत्तेचा वाली असा कोणीच नसल्यामुळें राजाची परिस्थिति मात्र उत्तरोत्तर चमत्कारिक होत गेली ! ता. ६ आक्टोबरपासून राजा वास्तविक पहातां ' राष्ट्रीय मंडळा'चा कैदीच झाला असून प्रत्येक बैठकीच्या वेळी नवीन कायदे करून त्याची राजाची चमत्कारिक परिस्थिति. सत्ता हिरावून घेतली जात होती. 'राष्ट्रीय मंडळा'ने या नवीन केलेल्या