पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वॅ. ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २०७ हें प्रत्येकाचें कर्तव्य आहे असें या पत्रकांत प्रतिपादन केलेलें असे. याच सुमारास निरनिराळे क्लब स्थापन होऊन त्यांमध्यें क्रांतिकारक जाको- बिन् क्लब. क्रांतिकारक राजकीय बाबींचा खल होत असे. फ्रान्समधील प्रत्येक कॉफीगृहास तेथें चाललेल्या या क्लबची असून हलके राजकीय बाबींच्या ऊहापोहामुळें राजकीय क्लबांचेंच स्वरूप प्राप्त झालेलें होतें. अशा प्रकारच्या निरनिराळया क्लबांपैकी 'जाकोबिन क्लब' आपल्या ज्वलज्जहाल क्रांतिकारक विचारांनीं सर्वांच्या पुढें आला. पहिल्या प्रथम अगदीं लहान पायावर स्थापना झाली हलके सर्व फ्रान्सभर या क्लबच्या शाखा पसरूं लागल्या. परंतु दुर्दैवानें थोडक्याच काळांत हा क्लब जहाल क्रांतिकारक लोकांच्या ताब्यांत जाऊन त्यांच्या विचारांचा पगडा या क्लबवर पडूं लागला. लाफेट व मिरॅबो या दोन पुढाऱ्यांचें या क्लबवरील वर्चस्व नष्ट झालें व रोबेसपिअरसारख्या माथे- फिरू माणसानें या क्लबवर आपलें वजन बसविलें ! फ्रान्समध्ये अशा प्रकारची बेबंदशाही माजली असतां इकडे १७८९ व १७९० हीं दोन वर्षे 'राष्ट्रीय मंडळां ' तील सभासदांनी फ्रान्ससाठीं नवी राज्यव्यवस्था कशी असावी हें ठरविण्यांत घालविलीं. त्यानंतर अमीर उमराव व धर्माधिकारी यांना असलेले विशिष्ट हक्क आतां नवीन राज्यपद्धतींत असावेत कीं नाहीं हा महत्त्वाचा प्रश्न पुढें आला; परंतु या प्रसंगी या वरिष्ठ वर्गाच्या लोकांनी मोठ्या उदारतेनें आपणास असलेले विशिष्ट हक्क स्वखुषीनें सोडण्याचें कबूल करून इतर लोकांप्रमाणें कर देण्यास तत्पर असल्याचें जाहीर केलें ( ४ ऑगस्ट ). फ्रान्समधील नवीन राज्यघटना कशा प्रकारची असावी याबद्दलची चर्चा करण्यामध्यें हैं ' राष्ट्रीय मंडळ ' गुंतलें होतें. आतां या 'राष्ट्रीय मंडळा'च्या मताप्रमाणें फ्रान्सची नवी राज्यघटना कशाप्रकारची | झाली असेल हें कांहीं विषद करून सांगावयास पाहिजे असें नाहीं; कारण