पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण कराव्यात असें त्यास वाटत होतें. परंतु इतर सभासदांवर आपलें म्हणणें जोरदाररीतीनें विववितां न आल्यानें त्यास लोकांचा पुढारी होतां आलें नाहीं. हलके हलके लोकांचा याच्यावरील विश्वास उडत गेला.. त्याचा जन्म एका श्रीमान् घराण्यांत झाला असल्यामुळे लोकांस अर्थातच त्याच्या हेतूंबद्दल शंका वाटूं लागली; व त्याचें गत आयुष्य शुद्ध नसल्यानें लोक त्याच्या विरुद्ध वाटेल त्या कंड्या पिकवूं लागले ! 90/ 'राष्ट्रीय मंडळा' पुढे पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्यव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा करणें हा होय. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्या- मुळे त्या प्रश्नाचा शांतपणे सर्व बाजूंनीं विचार होणें इष्ट होतें. त्या-- वेळी बोलाविण्यांत आलेल्या 'राष्ट्रीय मंडळा'मध्ये जमीनदार व संपत्ति- वान् लोकांचे प्रतिनिधी असल्यानें प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करण्यांत येईल असे वाटण्यास सबळ कारण होतें. परंतु दुर्दैवाने या राष्ट्रीय मंडळावर माथेफिरू लोकांचा पगडा बसून या सभे-- कडून महत्त्वाच्या गोष्टींचा शांतपणे विचार होईना ! हलके हलके खाल च्या प्रतीचे लोक पुढे येऊं लागून राज्यव्यवस्थेत सुधारणा करणें म्हणजे सर्व राज्यव्यवस्था मोडून टाकून सर्वत्र बेबंदशाही माजविणें असाच ही मंडळी सर्व सुधारणांचा अर्थ करूं लागली.. तेव्हां अशा अननुभविक व प्रत्येक गोष्टीचा केवळ तात्त्विक दृष्टीनेच विचार करणाऱ्या लोकांच्या हातांत या सभेचीं सर्व सूत्रे गेल्यामुळेच आपणास फ्रेंच राज्यक्रान्तीचे अनिष्ट परिणाम झालेले दिसतात ! बॅस्टील तुरुगं फो- डण्यांत येतो. १४ जुलै लागला. परंतु या सर्व अनिष्ट परिणामांस राजा व 'राष्ट्रीय मंडळांतील सभा- सद यांनाच आपण जबाबदार धरिलें पाहिजे; कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीचा तडजोडीनें विचार करण्याचा प्रयत्न न करतां आपल्या हातांत अधिक सत्ता असावी म्हणून प्रत्येक पक्ष खटपट करूं अशा प्रकारें राजा व लोकांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये तीव्र मत- १७८९.