पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें . ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. राष्ट्रीय मंडळ ( १७८९ - १७९१ ). २०३ फ्रान्सच्या सांपत्तिक स्थितीचा विचार करून राष्ट्रांत कोणत्या सुधारणा करणें इष्ट आहे याचा विचार करण्यासाठीं बोलाविण्यांत आलेल्या 'राष्ट्रीय मंडळांतील प्रतिनिधि स्वदेशाभिमानानें प्रेरित झाले असून फ्रान्सचें खरोखरीच हित इच्छिणारे होते. परंतु त्यांच्यामध्ये असलेल्या एका अवगुणामुळें त्यांच्या सर्व सदिच्छेवर पाणी पडल्यासारखें झालें ! या सभेतील बरीच मंडळी प्रत्येक गोष्टीचा केवळ तात्त्विक दृष्टीनेंच विचार करीत असून ती गोष्ट व्यवहाराच्या कसोटीस उतरते कीं नाहीं याकडे दुर्लक्ष करणारी होती. त्यांना अनुभव मुळींच नव्हता. ते आपल्या ज्ञानांचा उपयोग, ‘राष्ट्रीय मंडळा'मध्ये आपल्या विद्वत्तेचा व ज्ञानाची प्रौढी मिरवून अधिक वक्तृत्व करण्याकडेच करीत ! राष्ट्रीय मंडळांतील अननुभविक सभासद. या 'राष्ट्रीय मंडळांतील एकंदर बाराशें सभासदांपैकीं कांहीं थोडी मंडळी हलके हलके सर्वाच्या पुढे येऊं लागली; व त्यामध्यें लाफेट, रोबेस- पेअर व मिरॅबो हे प्रमुख होत. लाफेट याचा जन्म सरदारी घराण्यांत झाला होता, तरी त्यानें मध्यम स्थितींतील लो लाट, रोबेस पर व मिरॅवो. दाखविली असून, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या लढाईत त्या राष्ट्रास बरीच मदत केली होती. रोबेसपेअर याचा धंदा वकिलीचा असून जरी याच्या कल्पना व विचार उन्नत नव्हते, तरी देखील आपला कल लोकांच्या बाजूला आहे असें यानें दर्शविलें होतें. या दोन व्यक्तीं- पेक्षां मिरॅबो याचे विचार केवळ तात्त्विक नसून ते व्यवहाराच्या कसोटीस उतरतात कीं नाहीं हैं प्रचलित असलेली राजसत्ता उलथून पाडून सर्वत्र बेबंदशाही माजविली म्हणजे लोकांस स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावयास मिळतो असें नव्हे, अशी त्याची समजूत असल्यामुळे "पूर्वीची राज्यपद्धति कायम ठेवून त्यामध्ये अवश्य तेवढ्याच सुधारणा पहाण्याकडे असत.