पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वे. ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति, २०५ भेद असल्यामुळे राजाच्या विरुद्ध वाटेल त्या कंड्या पिकूं लागल्या. राजा सर्व सत्ता आपल्याच हातांत अनियंत्रित रीतीनें घेण्याचा प्रयत्न करीत असून, सर्वत्र सुलतानी गाजविण्याचा त्याचा विचार आहे, अशा प्रकारच्या त्या कंड्या असल्यामुळे पॅरिसमधील लोक चवताळले व त्यांनी १४ जुलै रोजी बॅस्टील तुरुंग फोडून सर्व कैद्यांस मुक्त केलें ! पॅरिसमध्ये झालेल्या प्रकारावरून राजानें धडा घेऊन लोकांच्या वि- -रुद्ध आपल्या सैन्याचा उपयोग करण्याचा विचार त्यांनें आतां सोडून दिला. राजाचें असें सौम्य वर्तन पाहून लोकांनींही शांत होऊन जिकडे तिकडे शांतता राखण्यासाठी 'राष्ट्रसंरक्षक सैन्य' निर्माण करून लाफेट - नांवाच्या एका लोकप्रिय सरदारास त्याचा सेनापति केलें. परंतु इतकें जरी झालें तरी या नवीन निर्माण केलेल्या सैन्यास शांतता ठेवतां येईना ! कारण हलके हलके प्रचलित राज्यपद्धतीविरुद्ध सर्वत्र अस्वस्थता माजली असून जुनी घडी पार उलथून देण्याचा फ्रेंच जनतेचा विचार होता; व या जनतेस आंवरणें ' राष्ट्रसंरक्षक सैन्या' स देखील अशक्य होतें ! तें कसें अशक्य होतें हैं खालील प्रसंगावरून व्यक्त होईल. आक्टो- बर महिन्याच्या सुमारास एक नवीनच अफवा पसरली असून त्यामुळे फ्रान्समधील लोक अधिकच चवताळले. ती अफवा म्हणजे फ्रान्समधील राज्यक्रान्ति सैन्याच्या मदतीनें पार चेंपून टाकून पुनः सर्वत्र अस्मानी- सुलतानी स्थापण्याचा १६ व्या लुईचा विचार आहे; व फ्रान्समध्ये नुकता- च पडलेला दुष्काळ १६ व्या लुईनें सर्व धान्य मुद्दाम खरेदी करून पाडण्यांत आला होता, अशी ती अफवा होय ! अशाप्रकारची चमत्का- रिक अफवा पसरल्यावर आक्टोबरच्या ५ व्या तारखेस गरिबीनें गांजलेल्या दहा हजार बायका व्हर्सेल्सहून राजाला पॅरिसमध्ये आणण्यासाठी निघाल्या; व वाटेंत त्यांना बरीच मंडळी मिळून ही मोठी टोळी व्हर्सेल्सला दाखल झाली. परंतु देशांत शांतता राखण्यासाठी निर्माण झालेल्या 'राष्ट्रसंरक्षक सैन्याचा अधिपति लाट