पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे निरनिराळ्या सभांतून आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असावा, कीं त्यांनीं मध्यम स्थितींतील लोकांबरोबरच एकाच सत बसून आपलें मत द्यावयाचें ? मध्यम स्थितींतील लोक म्हणूं लागले कीं, हल्लीं जी सभा बोलावली आहे ती 'राष्ट्रीय' आहे, व अमुक एका वर्गाचे प्रतिनिधि म्हणून आपण येथें जमलों नसल्यानें सर्वांनी एकत्र बसून एकाच सभेतून आपलें मत व्यक्त करणें इष्ट होय. त्यावेळीं मध्यम- स्थितींतील लोकांच्या प्रतिनिधींची संख्या अमीरउमराव व धर्माधिकारी यांच्या संख्येच्या बेरजेइसकी म्हणजे सहाशें असल्यामुळे सर्वांची एकत्र बैठक भरल्यास आपणास आपल्या इच्छेप्रमाणें वाटेल तें करून घेतां येईल असें मध्यम स्थितींतील लोकांस वाटत होतें. परंतु त्यांच्या सूचनेस अर्थातच अमीरउमराव व धर्माधिकारी यांच्याकडून विरोध आला. एक महिनाभर अशा रीतीनें उभयपक्षांमध्यें या प्रश्नाबद्दल मतभेद झाल्यावर मध्यम स्थितींतील वर्गांनीं असें जाहीर केलें कीं, सध्यां भरविण्यांत आलेली सभा ‘राष्ट्रीय ' आहे, व या सभेमध्यें एकत्र बसून आमच्या बरोबर ' राष्ट्रीय ' प्रश्नांचा विचार करण्यासाठीं अमीरउमराव व धर्माधि- कारी यांचे प्रतिनिधि आले नाहींत, तरी आपण त्यांच्याखेरीज सभेचें काम चालवू. मध्यम स्थितीं- तील लोकांच्या या चमत्कारिक वर्तनानें घाबरून जाऊन पूर्वीच्या पद्धतीनेंच निरनिराळ्या सभांत बसून या राष्ट्रीय मंडळां- तील काम चालविलें पाहिजे, असा लुईनें धाक घातला. परंतु राजाच्या या धाकास न जुमानतां जेव्हां मध्यम स्थितींतील लोकांनीं आपल्याच म्हणण्याप्रमाणें वागण्याचें ठरविलें, तेव्हां लुईनें नरम येऊन अमीर- उमराव व धर्माधिकारी यांना मध्यम स्थितींतील लोकांबरोबर एकाच बैठकींत बसून आपलें मत देण्याचा हुकूम फर्माविला ( १७ जून ). तेव्हां फ्रान्समधील राज्यक्रांति होण्यापूर्वीच फ्रान्समधील सर्व सत्ता वरिष्ठ वर्गाच्या हातची जाऊन ती मध्यम स्थितींतील लोकांच्या हातीं गेली होती असे म्हटले पाहिजे ! 'राष्ट्रीय मंडळांती'ल वाद.