पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वे. ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. १९७ त्यांची स्थिति फारच शोचनीय होती. कामकरी वर्गास आपली उन्नति करून घेण्याचा कोणताच मार्ग नव्हता ! त्यांच्या वरच्या वर्गांनी मोठ- मोठे व्यापारी संघ आपल्यापुरतेच निर्माण करून या वर्गास पायाखालीं दडपून ठेवलें होतें, व यांना वर डोकें काढण्यास मुळींच बाब ठेवलेला नव्हता ! परंतु या कामकरी वर्गापेक्षांही शेतकरी वर्गाची फारच कष्टप्रद स्थिति झालेली होती. फ्रान्समधील चवथा वर्ग. वर्गाकडून आपल्या मोठमोठे जमीनदार या जमिनीबद्दल भाडें वसूल करीत, धर्माधिकारी चर्चच्या व्यवस्थेसाठीं यांच्या- वर डोईजड पट्टी बसवीत, सरकार या वर्गाकडून कराच्या रूपानें पैसे घेई ! अशाप्रकारें निरनिराळ्या रीतीनें या वर्गाकडून इतर सर्व वर्ग पैसे घेत असल्यामुळे दिवसभर देशांत काम करून देखील रात्रीं कोरडी भाकरी मिळण्याचीही या वर्गास भ्रांत पडूं लागली; व याखेरीज सरंजामी पद्धती -- च्या नियमास अनुसरून आणखी कांहीं कर या वर्गास द्यावें लागत ते निराळेच ! तेव्हां फ्रान्समधील चवथ्या वर्गाची अशी कष्टप्रद स्थिति असल्यामुळे या स्थितींतून आपली सुटका कशी होते याचीच फ्रान्समध चवथा वर्ग नेहमीं विवंचना करीत असे. फ्रान्समधील बहुजनसमाजाची अशी कष्टप्रद स्थिति झाली असतांना त्यांच्या विचारास व आचरणास नवीनच वळण लावणारा एक वर्ग निर्माण झाला व तो वर्ग म्हणजे लेखक व तत्त्ववेत्ते यांचा होय अठराव्या शतकांत सर्व युरोपभर नवीन विचारांच्या लाटा पसरू लागल्या. पूर्वीच्या पिढीजाद चालीरीती, धर्मसमजुती, आचारविचार, यांवर विचारी लोक टीका करूं लागले. जें युक्तीस पटतें व आधुनिक शास्त्रीय शोधांच्या कसोटीस उतरतें त्यासच मान द्यावयाचा व इतर सर्व गोष्टींस तुच्छ लेखावयाचें अशीच प्रत्येकाची समजूत होत होती. धर्माच्या नांवाखालीं धर्माधिकाऱ्याकडून इतर वर्गावर होत असलेला जुलूम व त्यांचें स्वतःचें धर्मबाह्य निंद्य आचरण, अमीर उमराव