पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण राव यांची फार तर पंचवीस हजार कुटुंबे असून एकंदर लोकसंख्या दीड लाखापेक्षां अधिक नव्हती व याखेरीज धर्माधिकारी वगैरे लोकांची संख्या तितकीच भरेल. म्हणजे फ्रान्सच्या एकंदर अडीच कोटी लोकसंख्येपैकीं तीन लक्ष लोकांस विशिष्ट हक्क असून फ्रान्समधील अर्ध्या अधिक जमिनी यांच्या मालकीच्या होत्या; व राहिलेल्या अर्ध्या जमिनींवर फ्रान्समधील सव्वादोन कोटींहून अधिक माणसांस आपला गुजारा करावा लागे, व याच बहुजनसमाजास सर्व प्रकारचे कर सरकारांत भरावे लागत ! तेव्हां फ्रान्सच्या या चमत्कारिक स्थितीकडे पाहिलें म्हणजे अर्थशास्त्राचें एक नवीनच तत्त्व फ्रान्समध्यें अमलांत आलेलें दिसतें, व तें तत्त्व म्हणजे ज्या माणसांस कर देण्याची ऐपत नाहीं अशा गरीब लोकांकडून कर वसूल करून घेण्यांत येई व ज्यांना वास्तविक पहातां कर देण्याची ऐपत आहे अशा वरिष्ठ व श्रीमान् वर्गातील लोकांस करापासून मुक्तता मिळे ! तेव्हां फ्रान्समधील अमीरउमराव व धर्माधिकारी या दोन विशिष्ट हक्क असलेल्या वर्गांव्यतिरिक्त तिसऱ्या मध्यम स्थितींतील वर्गाचे लोकांसही मोठमोठ्या हुद्याच्या जागा मिळत नसल्यामुळे त्यांस आपलें सर्व कौशल्य दुस- रीकडे खर्च करणें भाग पडलें. व्यापारधंदा व वाङ्मयसेवा या गोष्टींकडे हा वर्ग आपले लक्ष घालूं लागला. व्यापार व उद्योगधंदा ह्या गोष्टींकडे या बगीनें आपले सर्व कौशल्य खर्च केल्यामुळे थोडक्याच वेळांत काटकसर करून हा वर्ग अमीर उमराव व धर्माधिकारी या आळशी व निरुद्योगी वर्गापेक्षां श्रीमान् होऊं लागला. अशाप्रकारें केवळ सांपत्तिक बाबतींतच नव्हे, तर विद्वत्ता, ज्ञान, वाङ्मयसेवा या बाबींमध्येही पिढीजाद अमीरउम- रावांच्या वर्गापेक्षां फ्रान्समधील हा तिसरा वर्ग पुढें येऊं लागला. या तिसऱ्या वर्गाची सुधारणा होतां होतां अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटीं फ्रान्सचें सर्व ज्ञान याच वर्गामध्यें सांठलें आहेसें भासूं लागलें. फ्रान्समधील तिसरा वर्ग . फ्रान्समधील तिसऱ्या वर्गानें आपली सुधारणा करून घेतली होती तरी फ्रान्समधील शेतकरी व कामकरी वर्ग, ज्यांना चवथा वर्ग म्हणत