पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ फ्रान्समधील लेखक- वर्ग व्हॉल्टेर व रूसो, युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण वर्गीस असलेले विशिष्ट पिढीजाद हक्क, राजसत्तेचा जुलमी बादशहां- कडून होत असलेला दुरुपयोग, या सर्वावर नवीनच निर्माण झालेला लेखकवर्ग टीका करूं लागला. जरी, पूर्वापार असलेल्या समजुती व आचारविचार यांवर युरोपमधील सर्व राष्ट्रांतील विचारी लोकांकडून टीका- प्रहार होत होते, तरी या लेखकवर्गातील प्रमुख नांवें फ्रान्समधील होत. 'व्हॉलटेर व रूसो या दोन फ्रेंच लेखकांनी ही मोहीम मोठ्या जोरानें सुरू केली. व्हॉलटेरचा रोख त्या वेळच्या धर्म- समजुतीवर असल्यामुळे त्यानें आपल्या उपरोधिक व कडक लेखांनीं धर्माच्या नांवाखाली होत अस- लेलीं वेडगळ कृत्यें, धर्माधिकाऱ्यांचे निंद्य वर्तन, लोकांच्या वेडगळ सम- जुती व आचारविचार या सर्वांवर आपल्या लेखांनीं टीकाप्रहार करून लोकांच्या धार्मिक समजुतींत बरीच क्रांति घडवून आणली. व्हॉलटेरनें आपल्या लेखांनी लोकांच्या धार्मिक समजुती शिथिल केल्या होत्या, परंतु रूसोनें आपल्या लेखांनी लोकांच्या सामाजिक व राजकीय विचारांत क्रांति • घडवून आणून फ्रान्सच्या राज्यक्रान्तीसाठी लोकांचीं मनें तयार केलीं. रूसोनें आपल्या लेखांत व पुस्तकांत असें प्रतिपादन केलें होतें कीं, प्राचीन काळीं सर्व लोक एकाच दर्जाचे असून त्या वेळीं श्रीमंत व गरीब, जुलूम करणारे व जुलूम करून घेणारे वर्ग अस्तित्वांत नव्हते. त्या वेळीं सर्वत्र शांतता, समता, विश्वबंधुत्व व स्वतंत्रता' पूर्णपणें नांदत असून समाज खरोखरीच सुखी होता. परंतु दुष्ट, स्वार्थी व आपमतलबी माणसांच्या प्रेरणेनें ती स्थिति नाहींशी होऊन कांहीं थोड्या लोकांनींच स्वतंत्रता बळ- कावून इतरांस गुलाम करून सोडलें ! समाजांत श्रीमंत व गरीब, जुलूम करणारे व जुलूम करून घेणारे वर्ग अस्तित्वांत येऊन बहुजनसमाजास आपल्या जन्मसिद्ध हक्कांस मुकावें लागलें. सामाजिक बाबीप्रमाणेंच - राजकीय बाबीमध्येही कांहीं थोड्या जुलमी लोकांनी राष्ट्रांतील सर्व सत्ता · आपल्या हातांत घेऊन बहुजनसमाजाची स्वतंत्रता हरण केली. लोकांनी