पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ १. ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. १९५ १४ व्यां लुईच्या कारकीर्दीत फ्रान्समधील राज्यव्यवस्था वि होत होती, त्याचप्रमाणें फ्रान्समधील समाजव्यवस्था देखील हलके हलके विस्खळित झाली होती. इतर युरोपीयन राष्ट्रांप्रमाणेंच फ्रान्सच्या समाज-- रचनेचा पाया सरंजामी पद्धतीवर बसविला होता. सरंजामी पद्धत ज्या वेळी पहिल्याप्रथम अस्तित्वांत आली त्यावेळेस धर्माधिकारी व मोठमोठे: अमीर उमराव यांना समाजव्यवस्था व देशरक्षण या कामी त्यांच्या- कडून होत असलेल्या कामगिरीबद्दल कांहीं विशिष्ट हक्क देण्यांत आले असून त्यांना कर माफ असे. परंतु अठराव्या शतकामध्यें राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे बादशहाच्या हातांत जाऊन पूर्वी अमीरउमराव यांच्याकडून करण्यांत येणाऱ्या सर्व गोष्टी आतां राजा आपल्या अधिकाऱ्यांमार्फत करवून घेई, तरी देखील पूर्वीप्रमाणेंच अमीरउमरावांना कर माफ असे.. अमीरउमराव, धर्माधिकारी यांच्याकडून राज्यकारभाराची व समाज- व्यवस्थेची कामगिरी करविण्यांत येत नाहीं तर त्यांना कर माफ काय म्हणून ? असा प्रश्न अर्थातच उपस्थित होई. अठराव्या शतकांतील फ्रान्सच्या समाजाकडे आपण पाहिलें तर आपणास तत्काळ दोन वर्ग दिसून येतात. त्यां- तील गरीब वर्गावर कराचें ओझें लादलेलें असे, फ्रान्समधील गरीब वर्गाची निकृष्टावस्था. तर दुसरा श्रीमंत व संपन्न वर्ग करापासून अजीबात मुक्त असे; श्रीमंत व संपन्न वर्गीस कांहीं विशिष्ट पिढीजाद हक्क असत तर गरीब वर्गास तसले कांहींच हक्क नसत. परंतु एवढ्यानेंच फ्रान्समधील बहुजनसमाजावरील जुलूम संपला असें नव्हे, तर विशिष्ट हक्क अस- लेल्या अमीरउमराव व धर्माधिकारी या वर्गासच मोठमोठ्या बहुमानाच्या जागा मिळत असून खालच्या वर्गाच्या लोकांना जरी ते योग्यतेनें किती- ही पात्र असले तरी -त्या जागा मिळत नसत ! करापासून मुक्त असलेल्या, व ज्यांना कांहीं विशिष्ट पिढीजाद हक्क असत. अशा वर्गाची लोकसंख्या कांहीं फारशी नव्हती. अमीरउम-