पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण फ्रान्सच्या अवन- तीची कारणें. अनुकरणीय गोष्ट होती, ज्या राष्ट्राची लोकसंख्या अडीच कोटी असून दुसऱ्या कोणत्याही प्रमुख राष्ट्रांच्या मानानें अधिक होती, ज्या राष्ट्रांतील लोक उद्योगधंदा व विद्वत्ता यांमध्ये इतर राष्ट्रांपेक्षां पुढें होते, त्या वैभवशाली राष्ट्राची 'सप्त- वार्षिक' युद्धांतील पराभवानंतर एकदम अवनति होऊन पुनरपि हें राष्ट्र पूर्व स्थितीप्रत येणें म्हणजे अगदींच अशक्य गोष्ट आहे असें प्रत्येकास वाटणें म्हणजे खरोखरच आश्चर्य होय ! तेव्हां अठराव्या शतकाच्या उत्तरार्धीत फ्रान्सची इतकी अवनति होण्याचें कारण काय याचा खोलवर विचार केला, तर आपणास एवढें कबूल करावें लागेल, कीं फ्रेंच लोकांच्या अंतस्थ न्यूनतेमुळें, त्यांच्या स्वाभाविक दुर्बलतेमुळे, किंवा त्यांच्या राष्ट्रीय नेभळेपणामुळे ही अवनति झाली नसून या अवनतीचें कारण आपणास इतरत्र शोधलें पाहिजे, व तें कारण म्हणजे फ्रान्समधील राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था यांमधील विस्खलित- पणा हैं होय. सतराव्या शतकामध्यें रिशल्यू, मॅझेरीन व १४ वा लुई यांच्या अविश्रांत परिश्रमानें राजकारभाराचीं सर्व सूत्रे बादशहाच्या एकंतत्री हातांत गेलीं होतीं. राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे आपल्या हातांत घेऊन आपल्याच अनियंत्रित सत्तेनें राज्यकारभार चालविण्यास राजा देखील १४ व्या लुई- प्रमाणें कर्तृत्ववान् असावयास पाहिजे; परंतु १४ व्या लुईनंतर फ्रान्सच्या गादीवर येणारा १५ वा लुई राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे आपल्या हातांत घेऊन राज्यकारभार चालविण्यास अगदींच असमर्थ होता व त्यामुळे बादशहाची खुशामत करणारे अमीर उमराव व बादशहावर मोहपाश टाकणाऱ्या स्त्रिया यांच्या हातांत राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे गेली. या खुशमस्कन्या माणसांचा डोळा आपली तुंबडी भरण्याकडेच असल्यामुळे आपल्या अधिकाराचा दुरोपयोग करून ते राष्ट्राच्या खर्चानें स्वतःचेच खिसे गरम करूं लागले !