पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें . फ्रान्समधील राज्यक्रान्ति. खत्तराव्या शतकामध्ये रिशल्यू, मॅझरिन, कोलबर्ट व चवदावा "लुई यांच्या दीर्घ प्रयत्नानें फ्रान्सचा वैभवसूर्य सर्व युरोपभर प्रामु- ख्यानें प्रकाशित होत होता; परंतु चवदाव्या लुईच्या मृत्यूनंतर ( १७१५ ) कांहीं वर्षे लोटलीं नाहीं तोंच, तो वैभवसूर्य अस्तंगत होत आहेसें सर्वास भासूं लागलें. सप्तवार्षिक युद्धांत ( १७५६-१७६३ ) फ्रान्सचें युरोपमधील वर्चस्व नाहींसें होऊन त्या राष्ट्रास उतरती कळा लागल्याचीं चिन्हें स्पष्ट दिसूं लागलीं. या युद्धांत जर्मनीमध्यें फ्रान्सच्या नांवाजलेल्या सैन्याचा पराभव झाल्यामुळें फ्रान्सचें लष्करी श्रेष्ठत्व नाहींसें झालें व समुद्रावर इंग्लंडशीं झुंज करतांना फ्रान्सला हार खावी लागल्या- मुळें फ्रान्सचें आरमारी वर्चस्व नाहींसें होऊन फ्रान्सच्या वसाहती इंग्लि- शांच्या ताब्यांत गेल्या. परंतु युरोपमधील फ्रान्सचें लष्करी व आरमारी वर्चस्व नाहींसें होणें एवढाच या युद्धाचा अनिष्ट परिणाम फ्रान्सला भोगावा लागला असें नव्हे; कारण या युद्धाचा एवढाच अनिष्ट परिणाम असता तर कालांतरानें आपलें नष्ट झालेलें वर्चस्व पुनरपि प्रस्थापित करणें फ्रान्सला शक्य झालें असतें. परंतु या युद्धाच्या समाप्तीच्या वेळीं झालेल्या पॅरिसच्या तहानंतर (१७६३ ) फ्रान्सची स्थिति इतकी वाईट झाली होती, कीं त्या स्थितींतून तें राष्ट्र पुनरपि पूर्व स्थितीप्रत येणें म्हणजे - अगदींच अशक्य गोष्ट आहे असें प्रत्येकास वाटूं लागलें. ज्या वैभवशाली राष्ट्रानें थोडक्याच वर्षांपूर्वी १४ व्या लुईच्या कारकीर्दीत सर्व युरोपवर आपले वर्चस्व स्थापलें होतें, ज्या राष्ट्रास युरोप- • मधील इतर राष्ट्रं प्रत्येक बाबतींत अग्रेसरत्वाचा मान देत, ज्या पराक्रमी • बादशहाचा - १४ व्या लुईचा दरबार म्हणजे इतर सर्व राजेरजवाड्यांस